फलटणमध्ये श्रीमंत मालोजीराजे, श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सव
फलटण :श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने मंगळवार दि.१४ मे ते दि.२५ मे दरम्यान श्रीमंत मालोजीराजे यांची पुण्यतिथी (दि.१४) व श्रीमंत शिवाजीराजे यांची जयंती (दि.२५) निमित्त श्रीमंत "मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सव - २०२४"चे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे सचिव माजी प्राचार्य विश्वासराव देशमुख यांनी दिली.
दि.१४ रोजी सायंकाळी ६ वाजता मुधोजी हायस्कूल येथील रंगमंचावर स्मृती महोत्सव उद्घाटन व प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांना श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दि.१५ रोजी महेश हिरेमठ (झी टीव्ही 'सारेगम' स्पर्धेतील अंतिम विजेता) यांची निर्मिती असलेला मराठी व हिंदी लोकप्रिय गीतांचा बहारदार कार्यक्रम नृत्यविष्कारासह होणार आहे. दि.१६ रोजी वीरेंद्र केंजळे (झी अल्फा मराठी 'सारेगम' स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते) प्रस्तुत "साज" जुनी व नवीन मराठी गीतांची सुरेल मैफल रंगणार आहे.
दि.१७ रोजी "ग्राम विकासाचा आदर्श" या विषयावर भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान होणार असून याप्रसंगी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. दि.१८ रोजी स्टार प्रवाह फेम शाहीर अविष्कार देसिंगे यांचा "शाहिरी पोवाडा : लोककलेचा अविष्कार" हा कार्यक्रम होणार आहे.
दि.१९ रोजी मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांचे "भारताची एकात्मता आणि मान्सून" या विषयावर व्याख्यान होणार असून याप्रसंगी मधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. दि.२० रोजी प्रख्यात कथाकथनकार ज्योतीराम फडतरे यांचे कथाकथन होणार आहे.
दि.२१ रोजी हास्यसम्राट फेम संजय कळमकर यांचा "हसण्यासाठी जन्म आपुला" हा मनोरंजन व प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. दि.२२ रोजी जागतिक कीर्तीचे महान जादूगार शिवम व भैरव आनंद जादूचे प्रयोग सादर करणार आहेत.
दि.२३ व २४ रोजी फलटण एज्युकेशन सोसायटीमधील सेवक कलावंत व विविध शाखेतील विद्यार्थी कलावंतांचा "कलाविष्कार" कार्यक्रम होणार आहे. दि.२५ रोजी या स्मृती महोत्सवाचा समारोप, बक्षीस वितरण व सत्कार समारंभ होणार असून याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषद माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
सर्व कार्यक्रम फलटण येथील मुधोजी हायस्कूल रंगमंचावर रोज सायंकाळी ६ वाजता होणार असून या सर्व कार्यक्रमांना शहरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
