गुणवरे-बरड रस्त्याच्या कामासाठी २ कोटी रुपये
एकता दर्शन: फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या २१ गावांतील रस्त्यांचा व अन्य पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली असून या कामामध्ये बरड ते गुणवरे रस्त्याच्या कामासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून लवकरच या रस्त्याचे काम सुरु होणार असल्याची माहिती आमदार दीपक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, नितीन भोसले, राहुल निंबाळकर उपस्थित होते.
या वर्षीच्या पुरवणी अंदाजपत्रकात फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील रस्ते व अन्य पायाभूत सुविधांच्या कामांचा समावेश केला आहे. श्रीमंत रामराजे यांच्या प्रयत्नामुळे हा निधी उपलब्ध झाला असून आणखी मोठ्या प्रमाणात निधी तालुक्याच्या विकास कामांसाठी राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे तालुक्यातील विकासकामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली जाणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना आमदार दीपक चव्हाण
अनेक दिवसांपासून गुणवरे-बरड रस्ता दुरुस्तीची मागणी या भागातील नागरिक करत होते. या रस्त्याच्या कामासाठी आता सुमारे २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने या भागातील नागरिकांच्यात समाधान व्यक्त केले जात आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
