मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना ‘विशेष राज्य अतिथी’ राजशिष्टाचार दर्जा मिळावा : रविंद्र बेडकिहाळ
एकता दर्शन (फलटण) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाकडून ‘विशेष राज्य अतिथी’ हा राजशिष्टाचार दर्जा मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना बेडकिहाळ यांनी सांगितले की, दि.१७ व १८ जानेवारी २०२३ रोजी इंदूर येथे ‘प्रांतीय मध्यप्रदेश मराठी साहित्य संमेलन’ पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी म.सा.प.चे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध वक्ते प्रा.मिलिंद जोशी यांची निवड झाली होती. त्यावेळी मध्यप्रदेश सरकारने प्रा.जोशी यांना जाण्या-येण्याच्या प्रवासासह इंदूर येथील वास्तव्यात ‘विशेष राज्य अतिथी’ दर्जा दिला होता. शिवाय राजशिष्टाचार म्हणून एस्कॉर्टसह वाहन, संरक्षण, निवास आदी सुविधा देण्यात आल्या होत्या.
मध्यप्रदेश सरकारने मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीबद्दल जशी उदार भूमिका दाखवली त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही यावर्षीपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या प्रचार, प्रसार व संवर्धनासाठी राज्य अतिथी दर्जाचा राजशिष्टाचार द्यावा. दि.३ फेब्रुवारी रोजी वर्धा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा करुन त्याच दिवसापासून संमेलन अध्यक्षांना असा विशेष दर्जा देण्याचे आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
सदर मागणीबाबतचा ठराव पुणे येथे झालेल्या म.सा.प. कार्यकारी मंडळ सभेत आपण मांडला असून तो सर्वानुमते मंजूर झाल्याची माहितीही बेडकिहाळ यांनी दिली
Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...
