इंडियन मेडिकल असोसिएशन फलटण शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. संजय राऊत यांची बिनविरोध निवड
एकता दर्शन (फलटण) : इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.आय.) फलटण शाखा नूतन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला. प्रतिथयश हृदयरोग तज्ञ डॉ. संजय राऊत यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी डॉ. संपत वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
येथील डॉ. जोशी हॉस्पीटलमधील सभागृहात आयोजित इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.आय) कार्यकारणी निवड बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. नूतन कार्यकारणीमध्ये डॉ. संतोष गांधी (उपाध्यक्ष) डॉ. सागर माने (सचिव), डॉ.जनार्धन पिसाळ (उपसचिव), डॉ. विक्रांत रसाळ (खजिनदार) महिला विंगमध्ये डॉ. सुनीता पोळ(अध्यक्ष), डॉ. सौदामिनी गांधी (उपाध्यक्ष), डॉ. संजीवनी राऊत (सचिव) आदींचा समावेश आहे

कार्यकारणी निवड बैठक आणि पदग्रहण समारंभप्रसंगी आय.एम.आय महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. डॉ. रवींद्र कुटे, सचिव डॉ. संतोष कदम, इलेक्शन कमिशन अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे, आय.एम.आय राज्याचे माजी अध्यक्ष व बारामती शाखेचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, आय.एम.आय राज्याचे माजी उपाध्यक्ष डॉ. अमरसिंह पवार, राज्य जॉईंट सेक्रेटरी डाॅ. वैभव चव्हाण, सेंट्रल वर्किंग कमिटी अध्यक्ष डॉ. एम.आर. दोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
आय.एम.आय फलटण शाखेची नवनिर्वाचित कार्यकारणी फलटणच्या वैद्यकीय क्षेत्राचा नावलौकिक राज्यस्तरावर पोहचवून एक आदर्श असे काम राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रात निर्माण करेल अशी अपेक्षा यावेळी डॉ. रवींद्र कुटे यांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास आय.एम.आयचे सर्व लाईफ मेंबर, डॉक्टर, सभासद उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
महात्मा एज्युकेशन सोसायटीत भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटी संचालित चतुराबाई शिंदे बालक मंदिर, श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळा आणि आचार्य...
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
