प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्यावतीने अमर शेंडे होणार सन्मानित
फलटण : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती, पुणे यांच्यावतीने महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे कार्यवाह तथा नवोदित लेखक अमर शेंडे यांचा वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जयंतीदिनी विशेष सन्मान होणार असल्याची माहिती, स्मृती समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
शुक्रवार, दि. १५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता पुणे येथील एस.एम.जोशी सोशालिस्ट फाउंडेशन सभागृहात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत "प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान" समारंभ पार पडणार आहे. यावर्षी प्रसिद्ध लेखक, वक्ते प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांना 'प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान' जाहीर झाला आहे. श्रवण संस्कृती समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या चतुरंग प्रतिष्ठानचे विद्याधर निमकर यांचा यावेळी विशेष सन्मान होणार असून वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठीच्या योगदानाबद्दल फलटणचे अमर शेंडे यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अमर शेंडे गेली २० वर्षे वृत्तपत्र, साहित्य, शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर आधारित ‘बाळशास्त्री’ चरित्र व ‘यशवंतराव चव्हाण विचारधन एक सुवर्ण ठेवा’ या साहित्यकृती शेंडे यांनी प्रकाशित केल्या आहेत.
साप्ताहिक लोकजागर दिवाळी अंक, विविध विषयांवरील स्मरणिका, गौरव ग्रंथ आदींच्या संपादनातही शेंडे यांनी आपला सहभाग नोंदवला असून त्यांनी लिहिलेले ‘मुंबईचे शिल्पकार नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट’ यांचे जीवन चरित्र महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या माध्यमातून प्रकाशनाच्या वाटेवर आहे. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आदी विषयांवरील त्यांचे लेखन विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहे. वाचन संस्कृतीच्या समृद्धीसाठी सुरू असलेल्या योगदानाबद्दल अमर शेंडे यांचा विशेष सन्मान होणार असून त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...

