मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ फलटणमध्ये मोर्चा
एकता दर्शन (फलटण) : भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी भीक मागुन शाळा चालविल्या असल्याचे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज फलटण येथे संविधान समर्थन मोर्चा समितीच्या वतीने निषेध मोर्चा काढून येथील प्रशासनास निवेदन देण्यात आले.
औरंगाबाद येथे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी भीक मागुन शाळा चालविल्या असल्याचे वक्तव्य केले होते त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. याचाच भाग म्हणून फलटण मध्येही मंत्री पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संविधान समर्थन मोर्चा समितीच्या वतीने आज येथील प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चाच्यावतीने प्रांत अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे उपस्थित होते.

मंत्री पाटील यांच्या वक्तव्यामुळे बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या असून महापुरुषांचा अवमान झाला असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व यापुढे महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यकर्त्यांवर कडक कारवाई करणारा कायदा तयार करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात नमूद करण्यात अली आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...
