प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड
फलटण : केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयातर्फे घेतलेल्या नवोदय विद्यालय प्रवेशपात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या प्रवेशपात्रता परीक्षेमध्ये फलटण येथील प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. त्यामध्ये वेदांत विशाल आंधळकर, व आदित्य हिरामण साबळे या विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांची नवोदयसाठी निवड झाली असल्याची माहिती संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड यांनी दिली.
सौ. गायकवाड म्हणाल्या, नवोदय विद्यालय प्रवेशपात्रता परीक्षेसाठी एकूण ८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी वेदांत आंधळकर, व आदित्य साबळे या २ विद्यार्थ्यांची सातारा येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे निवड झाली असल्याने शालेय स्तरावरील विविध परीक्षेत यश मिळवण्याची परंपरा यावर्षीही सरस्वती शिक्षण संस्थेने कायम ठेवली.
संस्थचे सचिव विशाल पवार यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना म्हणाले, विद्यार्थ्यांना सर्व सुविधांसह दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे म्हणून केंद्र शासनाने जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना केली असून विद्यार्थ्यांनी आपला शैक्षणिक विकास नवोदयच्या माध्यमातून करून घ्यावा.

संस्थचे अध्यक्ष प्रदीप माने, कोषाध्यक्षा सौ. सविता माने, संचालिका सौ. प्रियांका पवार, प्राचार्य संदीप किसवे, पर्यवेक्षक अमित सस्ते, समन्वयिका सौ. माधुरी काटकर, सौ. सुवर्णा निकम, श्रीमती योगिता सस्ते, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
