बाप से बेटा सवाई ; हिंदुरावांच्या स्वप्नांची पूर्ती खासदार रणजितसिंह यांनी केली
एकता दर्शन : निरा देवघर, धोमबलकवडी, फलटण-बारामती फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग या कामांचा फलटणमध्ये उच्चार जरी केला तरी अनेकांच्या भुवया उंचावत होत्या, टिंगल टवाळी व्हायची. मात्र हीच कामे आज पूर्ण होताना दिसत आहेत. या सर्व अनपेक्षित कामांचे स्वप्न माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी पाहिले होते, हेच स्वप्न प्रत्यक्ष सत्यात उतरवण्याचे काम त्यांच्याच खासदार सुपुत्रांनी पूर्ण केले, असे सांगत बाप से बेटा सवाई निघाला असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी व्यक्त केली.
केंद्रीय जल आयोगाची (CWC) निरा देवघर प्रकल्पास मान्यता मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर कोळकी (ता.फलटण) येथील शासकीय विश्रामगृहात खासदार रणजतसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती, याप्रसंगी साळुंखे-पाटील बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस जयकुमार शिंदे, ॲड.नरसिंह निकम, माझी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, अभिजीत नाईक निंबाळकर यांच्यासह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
खासदारांच्या कामांचे कौतुक करताना साळुंखे-पाटील म्हणाले, रणजितसिंह खासदार झाल्यानंतर वरील कामांच्या पूर्ततेसाठी ते केंद्र आणि राज्य शासन दरबारी धावत राहिले. केंद्र आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारही खासदारांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. याचा परिणाम प्रत्यक्ष कामे पूर्ण होण्यास झाला. माढा लोकसभा मतदारसंघात विशेषतः फलटण तालुक्यात सर्वसामान्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त विकासाची कामे खासदारांनी केली.
टिंगल करणाऱ्यांना कामातून प्रत्युत्तर
कोरोना काळात व त्यानंतरही खासदार रणजितसिंह यांनी पाठपुरावा सोडला नाही. अनेकांच्या चेष्टेला सामोरे जाऊन अनाकलनीय विकासाच्या कामाची बुलेट अपेक्षित गतीने चालवून सर्व कामांचे कृतीत रूपांतर करत टिंगल टवाळी करणाऱ्याला प्रत्युत्तर देण्यात खासदार यशस्वी झाले असल्याचे साळुंखे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
