भाजप अल्पसंख्यांक विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी सागर शहा
फलटण येथील युवा उद्योजक सागर शहा यांची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे स्वतः शहा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात राजकीयदृष्ट्या बळकट करण्यासाठी व माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह-नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आपण आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून काम करणार असून भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याच्या प्रतिक्रिया शहा यांनी व्यक्त केल्या आहेत.
सागर शहा यांच्या निवडीबद्दल खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद माजी सदस्या ॲड.सौ.जिजामाला नाईक-निंबाळकर, फलटण पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण शहर अध्यक्ष व ज्येष्ठ नेते अनुप शहा, माजी नगरसेवक अशोक जाधव, अभिजीत नाईक-निंबाळकर, सचिन अहिवळे, बजरंग गावडे, अमोल सस्ते, अशोक भोसले यांच्यासह भारतीय जनता पार्टी महिला, युवक सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
