फलटण पूर्व भाग वारकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर
एकता दर्शन, फलटण : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा बरड गावात एक दिवसाच्या मुक्कामासाठी विसावल्यानंतर येथील माऊली भक्त वारकऱ्यांच्या सेवेत दंग झाल्याचे चित्र सर्वदूर दिसत होते.
अन्नधान्य, वीज, पाणी व अन्य सोयी सुविधा माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी जणू काही स्पर्धाच लागली असल्याचे चित्र दिसत होते. बरड ग्रामपंचायत आणि फलटण पूर्व भागातील स्थानिक संस्था वारकऱ्यांसाठी काम करताना दिसत होत्या. तालुक्यातील माऊलींचा हा शेवटचा मुक्काम असल्याने फलटण पूर्व भागातील जवळपास ३६ गावातील नागरिक पालखीच्या दर्शनासाठी बरड येथे येत असतात. त्यामुळे बरड मध्ये माऊली भक्तांची मोठी गर्दी झाली होती.
महसूल व पोलीस प्रशासन वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी सज्ज झाले होते. संबंधित विभागाच्या विविध टीम काम करताना दिसत होत्या. स्थानिक नागरिकांमध्ये स्वर्गीय अर्जुनराव तेली यांचे कुटुंब वारकऱ्यांसाठी सेवा देण्यात दंग झाल्याचे चित्र होते. या कुटुंबासह अनेक दानशूर नागरिक व सामाजिक संस्था आपापल्या परीने कार्यरत असताना दिसत होत्या.

फोटो : रवी लिपारे
पालखी सोहळ्यात मोठी गर्दी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक पोलीस दूरक्षेत्रातील अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, स्वयंसेवी संस्थांच्या टीमने सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता.
या भागातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील लोक पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असल्याचे चित्र होते.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
