२० ग्रामपंचायतींची मतमोजणी आज होणार ; मतमोजणी यंत्रणा सज्ज
एकता दर्शन (फलटण) : दि. १८ रोजी फलटण तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज दि. २० रोजी सकाळी १० वाजता येथील शासकीय गोदामात १४ टेबलांवर ७ फेऱ्यांद्वारे होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार समीर यादव यांनी दिली आहे. सर्व निकाल दुपारपर्यंत अपेक्षित असून मतमोजणी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या या टप्प्यात एकूण २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहिर झाल्या होत्या. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीपर्यंत २४ पैकी ४ ग्रामपंचायती (मानेवाडी, वेळोशी, झडकबाईचीवाडी, मिरेवाडी कु.) बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित २० ग्रामपंचायतींसाठी (बरड, वडले, सोमंथळी, चौधरवाडी, कुरवली खुर्द, ताथवडा, मठाचीवाडी, गिरवी, तरडफ, पिंपरद, विडणी, वाठार निंबाळकर, दुधेबावी, आदर्की बु., आदर्की खुर्द, सुरवडी, पाडेगाव, सालपे, चव्हाणवाडी, कुसूर) दि. १८ रोजी मतदान झाले होते. या २० ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज मंगळवार दि. २० रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
या मतमोजणीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतमोजणी स्थळावर १४ टेबल लावण्यात आले असून ७ फेऱ्यांद्वारे मतमोजणी केली जाणार आहे. यासाठी १०३ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक, राखीव यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
