राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर : १८ ऑगस्टला मतदान
फलटण : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायत निवडणुकीच्या तारखांचा बिगुल वाजविला असून सातारा जिल्ह्यातील ५ नगरपालिकांचे मतदान दि. १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. यात फलटण नगरपालिकेचा समावेश आहे. पालिका निवडणूक कार्यक्रम व तारखांची प्रतिक्षा राज्य निवडणूक आयोगाच्या फतव्याने आता संपली असून अनेक राजकीय पक्षांची निवडणुकीसाठीची धावपळ पहायला मिळणार आहे.
राज्यात १७ जिल्ह्यांमधील पालिकांच्या निवडणूका होणार असून कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील म्हसवड, रहिमतपूर, फलटण, कराड, आणि वाई या पाच नागरपालिकांचा पहिल्या टप्यात समावेश आहे. जादा पर्जन्यमान ठिकाणच्या पालिका निवडणुका दुसऱ्या टप्यात होणार आहेत. यामध्ये सातारा, पाचगणी, आणि महाबळेश्वर या नगरपालिकांचा समावेश आहे.
२० जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून २२ ते २८ जुलै दरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करायचे आहेत. दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी २९ जुलै रोजी होणार आहे. दरम्यान उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ ऑगस्ट पर्यंत आहे.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती व बुलढाणा या १७ जिल्ह्यांमध्ये निवडणूक पार पडणार असून निवडणुकांचे निकाल १९ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे नमूद निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमात केले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
