फलटण तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी २९ कोटी ५० लाखांचा निधी
एकता दर्शन : फलटण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात २९ कोटी ५० लाख रुपयांच्या आर्थिक निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
फलटण-शिंगणापूर-म्हसवड-शेनवडी ते शिंगणापूर घाट संरक्षण भिंत व रस्ता सुधारणासाठी ४ कोटी रुपये, गिरवी नाका ते विंचुर्णी रस्त्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये, ताथवडा ते मानेवाडी फाटा रस्त्यासाठी ४ कोटी रुपये, दऱ्याचीवाडी ते बोडकेवाडी रस्ता सुधारणासाठी ४ कोटी रुपये, तरडफ-सपकाळ वस्ती ते उपळवे रस्त्यासाठी ३ कोटी रुपये, गिरवी ते मांडवखडक रस्त्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये, विडणी गावाजवळील कॅनॉलवर नवीन पुलाच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपये एकूण २५ कोटी रुपयांचा आर्थिक निधी मंजूर झाला असून ३०/५४ योजनेअंतर्गत १२२.१२ लाख, ५०/५४ योजनेअंतर्गत १ कोटी, जनसुविधा अंतर्गत ८७ लाख, नागरी सुविधा अंतर्गत ४५ लाख, 'क' वर्ग तिर्थक्षेत्र योजना अंतर्गत २५ लाख, साकव अंतर्गत ४० लाख असे एकूण २९ कोटी ५० लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
तालुक्यातील विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामांसाठी आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याने तालुक्यातील प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडले जाणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
