प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी सचिन मोरे
एकता दर्शन (लोणंद) : राज्यस्तरीय प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी फलटण येथील सचिन संपतराव मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुनील जगताप यांनी सचिन मोरे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करीत निवडीचे पत्र दिले. लोणंद येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित राज्याच्या पत्रकार संघाच्या बैठकीत मोरे यांची निवड केली.
यावेळी राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळभोर, कार्याध्यक्ष सचिन सूंबे, खंडाळा तालुका अध्यक्ष मोहन बोरकर, आबा धायगुडे, मंगेश माने, विजय शेळके, बोलकीस्ट शेख मॅडम, साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युम मुल्ला, मुकुंदराज काकडे, अमोल काकडे, बापू दोरके यांच्यासह अन्य राज्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
सचिन मोरे फलटण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात गेली १९ वर्ष कार्यरत असून त्यांच्या मालकीचे 'धैर्य टाईम्स' वृत्तपत्र, चॅनेल, व वेबपोर्टल चालवीत आहेत. पत्रकारितेमधील त्यांच्या उल्लेखनीय कार्याच्या पार्श्वभूमीवर सदरची निवड करण्यात आली आहे. सचिन मोरे यांच्या निवडीने वृत्तपत्र आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...
