फलटण तालुक्यातील बारावीचा ९०.९६% निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या परीक्षेत फलटण तालुक्यातील इयत्ता बारावीचा निकाल ९०.९६% लागला आहे. या परीक्षेसाठी तालुक्यातून ३०६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले होते. यापैकी ३०२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, यामधील २७५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून फलटण तालुक्यातील बारावी परीक्षेचा निकाल ९०.९६ टक्के लागला आहे.
फलटण तालुक्यातील मुधोजी महाविद्यालयाचा निकाल ९१.४४% लागला असून या विद्यालयातील शास्त्र शाखा ९९.३६, कला शाखा ८३.४१ व वाणिज्य शाखेचा ९६.५९% निकाल लागला आहे. सरदार वल्लभभाई विद्यालयाचा (साखरवाडी) ७६.१९% निकाल लागला असून या विद्यालयातील वाणिज शाखेचा १००% निकाल लागला आहे. यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय (फलटण) ८९.५०%, मुधोजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (फलटण) ९७.०७%, मालोजीराजे शेती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (फलटण) ९८.१२%, छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय (गिरवी) ७६.१९%, सौ.वेणूताई कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (फलटण) ८६.१५%, ज्योतिर्लिंग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (पवारवाडी, आसू) ४३.५८%, फलटण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (फलटण) ५२.३८%, जय भवानी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (तिरकवाडी) ८७.५०%, सरस्वती माध्य.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (बिबी) ६९.२३%, हनुमान माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (गोखळी) ६०%, श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय मलठण (फलटण ) ७२%, म.फुले हायस्कुल कनिष्ठ महाविद्यालय (सासवड) ८२.१४%, सरलष्कर बहाद्दर बाबाराजे खर्डेकर कनिष्ठ महाविद्यालय (हणमंतवाडी) ४२.८५%, हणमंतराव पवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (फलटण) ७२%, मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (बरड) ६४.५१%, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनि.कॉलेज (जाधववाडी, फलटण) ९७.७२%, वेणुताई चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (तरडगाव) ८०.६४%, जानाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (राजाळे) १००%, अम्बिशन इंग्लिश मिडीयम ज्युनिअर कॉलेज (आदर्की) १००%, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय १०० %, हाजी अब्दूल रज्जाक उर्दू हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय (फलटण) १००%, आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा (फलटण) १००% निकाल लागला आहे.
व्होकेशनल परीक्षेतील साखरवाडी येथील सरदार वल्लभभाई कनिष्ठ महाविद्यालयाचा १००%, यशवंतराव चव्हाण कॉलेज (फलटण) ७५.४७%, मुधोजी हायस्कूल (फलटण) ९२.१०%, मालोजीराजे शेती विद्यालय ७५%, सौ.वेणुताई चव्हाण कन्या कनिष्ठ महाविद्यालय (फलटण) ९६.१५% निकाल लागला आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
