दिगंबर आगवणेंना अटक ; दोन दिवसांची पोलिस कोठडी
फलटण : स्वराज नागरी सहकारी पंतसंस्थेला चुकीचे तारण देवुन त्या बदल्यात वखार व्यवसायासाठी सुमारे १ कोटी कर्जाची रक्कम घेवुन कर्ज फेडण्यास टाळाटाळ करणाऱ्या दिगंबर आगवणे यांना शहर पोलिसांनी अखेर अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आगवणे यांना दोन दिवसांची पोलिस कस्टडी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिगंबर आगवणे यांची सुरवातीला स्वराज पतसंस्थेत दोन कर्ज खाती होती, ती वेळेवर फेडून त्यांनी पतसंस्था व्यवस्थापनाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी १ कोटी रूपये कर्जाची मागणी केली होती, ती मागणी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुर करून संस्थेने त्यांना तारण मागणी केली होती.
आगवणे यांनी सुरवडी (ता. फलटण) येथील गट क्र. ४८/२ मधील ४.२२ हेक्टरपैकी २.६६ हेक्टर जमीन आपल्या मालकीची असल्याचे भासवुन सदर जमिनीची कागदपत्रे पतसंस्थेकडे जमा केली होती. महसूली शोध अहवाल प्राप्त झाल्यावर संस्थेने गहाणखत नोंदविले व त्या बदल्यात शेअर्सची रक्कम वजावाट करून उर्वरित ९९ लाख ४८ हजार रूपयांचे सात चेक (सातारा जिल्हा बँक) आगवणे यांना अदा केले होते.
कर्जदार आगवणे यांनी जमिनीची मालकी नसताना देखील आपलीच जमीन असल्याचे भासवून कर्ज फेडण्याऐवजी संस्थेवरच पोलिस व न्यायालयात तक्रारी दाखल केल्या होत्या, मात्र पोलिस व न्यायालयाने याची खात्री करून आगवणे यांचे गुन्हे फेटाळले होते. पतसंस्थेविरूध्द चुकीच्या तक्रारी केल्याचे पोलिस व न्यायालयाची खात्री पटल्यानंतर दिगंबर आगवणे यांना पोलिसांनी अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आगवणे यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या घटनेची तक्रार पतसंस्था व्यवस्थापक दत्तराज शिवाजीराव फडतरे (रा. फडतरवाडी ता. फलटण) यांनी दिली होती. त्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम करीत आहेत.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
