गुणवरे सोसायटीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचा ११/२ ने दणदणीत विजय
अवघ्या तालुक्याचे लक्ष लागलेल्या बहुचर्चित गुणवरे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव गावडे यांच्या नेतृत्वाखालील श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने सोसायटीवर वर्चस्व निर्माण करीत १३ पैकी ११ जागांवर विजयाची मोहर उमटवली असल्याने गुणवरे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीवर वर्चस्वाचा ध्वज फडकविला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पॅनेलला सलग चौथ्यांदा सत्ता संपादनाची संधी मतदारांनी दिली असून विरोधकांना अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
गुणवरे (ता. फलटण) : दिनांक १४ रोजी सकाळी ८ वाजता गुणवरे येथील प्राथमिक शाळेच्या वर्ग खोलीतील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरु झाली. सकाळी ८ ते सायं ४ दरम्यान मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण ७६५ मतदान पैकी ७३१ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजविला. मतदान प्रक्रियेनंतर मतमोजणी प्रक्रिया सुरु करण्यात आली. १३ संचालक मंडळाच्या जागेसाठी झालेल्या मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केली. यामध्ये सत्तारूढ गटाच्या ११ व विरोधी गटाच्या २ उमेदवारांचा समावेश आहे.
विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढील प्रमाणे, सर्वसाधारण कर्जदार प्रवर्गातून शिवाजी पांडुरंग गावडे (३८८), विठ्ठल दादा गौंड (३७७), शहाजी हणमंत गावडे (३७६), ज्योती शिवाजी गावडे (३६५), महादेव आनंदराव गावडे (३६०), चेतन बापूराव गावडे (३५८), दिलीप गबाजी गावडे (३५५), महिला राखीव प्रवर्गातून लक्ष्मीबाई मनोहर गावडे (३८८), विद्या प्रकाश फडतरे (३५८), इतर मागास प्रवर्गातून हरिश्चंद्र जोतिराम नाळे (३८०), अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून सुरेश रामहरी आढाव (३८१) हे ११ उमेदवार सत्तारूढ गटातून विजयी झाले आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गातून अभिजित रतन गावडे (३७३) आणि विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातून अमोल गजानन गौंड (३७३) हे २ उमेदवार विरोधी गटाचे विजयी झाले आहेत. एकूण १३ जागांपैकी ११ जागांवर सत्तारूढ गटाने विजय मिळवत सोसायटीवर वर्चस्व सिद्ध केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर अवघ्या २ जागांवर विरोधकांना समाधान मानावे लागले आहे.
गुणवरे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी संचालक मंडळाच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राजे गट पुरस्कृत श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचा दणदणीत विजय झाला असल्याने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली या सोसायटीवर चौथ्यांदा मिळविलेले वर्चस्व गुणवरेच्या राजकारणामध्ये महत्वपूर्ण मानले जाते. या निकालाने आगामी काळातील सत्तारूढ गटाची राजकीय समीकरणे बळकट होणार असल्याचे अधोरेखित केले आहे.

विजयानंतर श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या समर्थकांनी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर प्रांगणात गुलालाची उधळण, फटाक्याची आतिषबाजी, व ग्रामदैवताच्या नावाचा जयघोष करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी गुणवरे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बाळासाहेब गौंड, विद्यमान उपसरपंच प्रा. रमेश आढाव, ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक जे.पी. गावडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
विजयी उमेदवारांचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक-निंबाळकर, यांच्यासह सुभाष आढाव, सोपान आढाव, भारत आढाव (फौजी), दीपक शामराव आढाव, दयानंद आढाव, किशोर आढाव, गिरीधर आढाव, मिलिंद आढाव, नमा आढाव, कैलास आढाव, अजित उत्तम आढाव, अतुल आढाव, शशिकांत विठ्ठल आढाव, अर्जुन कीर्तिकर, अमोल लालासो आढाव, दीपक बाबासो आढाव, उत्तम गावडे (आबा) आदींनी त्यांचे अभिनंदन करून सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
विजयी उमेदवारांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
विजयी उमेदवारांनी डॉ. आंबेडकर नगर मधील बौद्ध विहारात जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी जे.पी. गावडे, शिवाजीराव गावडे, श्रीराम बझारचे संचालक बापूराव गावडे, श्रीराम कारखान्याचे संचालक विठ्ठल गौंड, बाळासाहेब गौंड, विलास चव्हाण, सौ. सविता आढाव, आदी उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
