ब्रेकिंग न्यूज

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

12:03 AM आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के

Monday, 18 May 2026

Follow Us:

विकासनिधी वाटपात कोणताही दुजाभाव करणार नाही : मंत्री शंभुराज देसाई

Share This Article:
विकासनिधी वाटपात कोणताही दुजाभाव करणार नाही : मंत्री शंभुराज देसाई

एकता दर्शन, फलटण : राज्याचे मुख्यमंत्री हे सातारा जिल्ह्यातील आहेत आणि मी जिल्ह्याचा पालकमंत्री त्यामुळे जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांच्या आमच्याकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. कार्यकर्त्यांना बळ देणे, त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्य असल्याचे सांगत मी जोपर्यंत जिल्ह्याचा पालकमंत्री असेन तोपर्यंत विकास कामांबाबत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना समान न्याय देऊन विकासनिधी वाटपात कोणताही दुजाभाव करणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावतीने फलटण येथील आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, जयवंत शेलार, तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम, विश्वासराव भोसले, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शारदाताई जाधव, विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, धनंजय दादा साळुंखे-पाटील, बजरंग गावडे, सुशांत निंबाळकर, अमोल सस्ते, साखरवाडीचे सरपंच विक्रम भोसले, विराज खराडे, नानासाहेब इवरे, अशोकराव जाधव, विजय मायणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावू :

मंत्री देसाई पुढे म्हणाले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या भागातील विविध प्रश्न उपस्थित केले असून त्यापैकी झिरपवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचा विषय आपण अनेक दिवसांपासून ऐकतोय यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागाचे सर्व अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावू.

फलटणमध्ये अनुशेष राहतोय याचे आश्चर्य : 

आमच्या सरकारने जलसंपदा विभागाच्या १८ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यापूर्वीच्या सरकारला हे काम करता आले नाही त्यामुळे नीरा देवघर विभागातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविले जातील. तत्कालीन महाविकास आघाडीच्या काळात जिल्ह्यातील फलटण आणि कराड तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी जात होता तरीही फलटणमध्ये अनुशेष राहतोय याचे आश्चर्य वाटत आहे. फलटण शहरातील विकास कामांचा अनुशेष भरून काढला जाईल.

तरुण कार्यकर्त्यांना ताकद देणार : 

हे सरकार आपले आहे. या जिल्ह्यात भाजप सेनेची पाती आहे. त्यामुळे जिल्ह्याला निधी देताना भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना मधील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन दोघांनाही विकास निधी दिला जाईल यामध्ये कुठलाही दुजाभाव केला जाणार नाही. ॲड. नरसिंह निकम यांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न मार्गी लावले जातील. फलटण येथील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे कार्यालय तरुण कार्यकर्त्यांनी काढले आहे त्याला ताकद देणे आमचे काम आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनीही जनतेशी सतत संपर्कात राहावे असा सल्ला यावेळी मंत्री देसाई उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

फलटणच्या विकासाचे पालकत्व घ्यावे :

यावेळी खासदार रणजितसिंह म्हणाले, झिरपवाडीतील शासकीय रुग्णालयाची इमारत इथल्या खाजगी हॉस्पिटलला जोडण्याचे राजकारण प्रस्थापितांकडून चालू आहे यात पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तालुक्यातील भाजप व बाळासाहेबांची शिवसेना खांद्याला खांदा लावून एकत्रित लढणार आहे. फलटण शहरातील अडीच वर्षातील विकासकामांचा अनुशेष भरून काढण्याची जबाबदारी आम्ही तुमच्याकडे पालकमंत्री म्हणून सोपवीत आहोत त्यामुळे आपण फलटणच्या विकासाचे पालकत्व घ्यावे अशी विनंती नव्हे तर नम्र विनंती करत असल्याचे यावेळी खासदारांनी स्पष्ट केले.

दरम्यान, तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांनी विविध प्रश्न उपस्थित करुन पालकमंत्रांचे लक्ष वेधले.

प्रारंभी पालकमंत्री व खासदार यांनी बाळासाहेबांची शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. यानंतर पालकमंत्री देसाई यांचा नागरी सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सचिन बिडवे, विजय मायने व नानासाहेब इवरे यांनी केले. प्रास्ताविक विराज खराडे व आभार विजय मायने यांनी मानले. 

कार्यक्रमास भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...

समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...

षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...

ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...

ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...