आगवणेंच्या तमाशात मुलगा तुषारची एंट्री : अनुप शहा
फलटण : दिगंबर आगवणे यांनी पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजले. वास्तविक आगवणे यांचा आजचा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष अनुप शहा यांनी व्यक्त केले.
शहा म्हणाले, आगवणेंना पोलीस ठाण्याची हवा सहन न झाल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून वैद्यकीय क्षेत्राचा आधार घेत बाहेर पडण्याचा त्यांनी आज तमाशा केला असून या तमाशात त्यांच्या मुलाची म्हणजेच तुषारची देखील एंट्री झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत आगवणे यांनी स्वतः प्रतिज्ञापत्राद्वारे कळवले होते कि तुषार त्यांचा मुलगा नाही, त्यामुळे राजकारणासाठी आपल्या स्वतःच्या मुलाला देखील आपले न म्हणणाऱ्याने आमचे नेते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप करणे योग्य नाही. सहानुभूतीसाठी आमच्या नेत्यांचा म्हणजेच खासदार रणजितसिंह यांच्या नावाचा उपयोग केल्यास आम्ही कदापि सहन करणार नसल्याचे शहा यांनी सांगितले.
Sponsored
संबंधित बातम्या
महात्मा एज्युकेशन सोसायटीत भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटी संचालित चतुराबाई शिंदे बालक मंदिर, श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळा आणि आचार्य...
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
