लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
फलटण : लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डनच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा येथील लक्ष्मीनगर मधील गौरीशंकर बंगला या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
२०२२-२३ या वर्षासाठी लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी म्हणून सौ. सुनंदा भोसले यांची यावेळी निवड करण्यात आली. सौ. सुनंदा भोसले यांनी सौ. सुनीता कदम, सौ. सुजाता सोनुलकर, सौ. नीलम देशमुख, व सौ. दिपाली निंबाळकर यांच्याकडून आपल्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी भोजराज नाईक निंबाळकर यांनी क्लबच्या नवीन १२ सदस्यांना शपथ दिली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
दरम्यान, २०२१-२२ या वर्षातील कार्याचा आढावा मांडताना सौ. सुनीता कदम, सौ. नीलम देशमुख, व सौ. पूनम कदम यांनी आगामी काळात सुमारे २ लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगून सन २०२१-२२ या वर्षाच्या कार्यकाळात सामाजिक उपक्रम राबवत असताना अनेक वैद्यकीय शिबिरं, वृक्षारोपण, बालक-पालक मेळावे, नवीन उद्योजकांना मार्गदर्शन, मधुमेह जनजागृती इत्यादी कार्यक्रम यशस्वी केल्याचे सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेल्वीन जोन्स फेलो यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. लायन्स क्लबच्या अध्यक्षा सौ. सुनीता कदम यांनी घंटानाद केला. ध्वजवंदन सौ. सुजाता सोनवलकर यांनी केले. सौ. नीलम देशमुख, सौ. पूनम कदम, व सौ. वैशाली कांबळे यांनी स्वागत गीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सौ. उज्ज्वला निंबाळकर यांनी लायन्स क्लब या आंतरराष्ट्रीय संघटनेचे कार्य व महत्व, शाखेची स्थापना आदी विषयांची सविस्तर माहिती दिली. जगदीश पुरोहित यांनी नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांना प्रोजेक्टरवर प्रात्यक्षिकं दाखवत त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून देत खेळीमेळीच्या वातावरणात शपथविधी संपन्न केला. सौ. सुजाता सोनवलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...
