माऊलींच्या स्वागतासाठी फलटण प्रशासनाची जय्यत तयारी
एकता दर्शन : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा फलटण तालुक्यात दि. २० ते २२ दरम्यान तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्कामासाठी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तालुक्याच्या सरहद्दीवर दि. २० रोजी प्रशासन व तालुका वासियांच्या वतीने माऊलींचे स्वागत करण्यात येणार आहे.
दि. २० रोजी तालुक्यातील आगमनानंतर पालखी सोहळा तरडगाव मुक्कामी विसावणार आहे. दरम्यान तरडगाव येथील चांदोबाचा लिंब येथे आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावरील पहिले उभे रिंगण होणार आहे. तरडगाव मुक्कामानंतर पालखी सोहळा दि. २१ रोजी फलटण शहरात एक दिवसाच्या मुक्कामाकरिता पालखी तळावर विसावणार आहे. यानंतर दि. २२ रोजी माऊलींचा पालखी सोहळा तालुक्यातील अखेरच्या मुक्कामाकरिता बरड या ठिकाणी मार्गस्थ होणार आहे.
तब्बल ३ दिवसांचा मुक्काम फलटण तालुक्यात विविध ठिकाणी असल्याने फलटण नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम, महसूल-पोलीस प्रशासन, पाटबंधारे, वीज वितरण आदी शासकीय विभागांसह अन्य विविध सामाजिक संस्थांनी पालखी सोहळ्यातील भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधांचे नियोजन केले आहे.
तालुक्यातील तरडगाव, फलटण, बरड या तीन ठिकाणच्या पालखी स्थळावर आपत्ती व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असणाऱ्या आपत्कालीन केंद्राची व वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी समन्वय केंद्राची स्थापन करण्यात आली असून पाणीपुरवठा करणारे ६५ शासकीय टँकर्स, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने दिंड्यांसोबत ४०० ते ५०० पाण्याचे टँकर्स, २३ ठिकाणी पाण्याचे टँकर भरण्याचे ३४ पॉईंट, प्रतिदिन ७०० पेक्षा जास्त टँकर भरण्याची क्षमता असणारे पाणीसाठे, पाणी शुद्धीकरण करणारी १९ पथके, पाणी तपासणी यंत्रणा यांसह तरडगाव-फलटण-बरड या ठिकाणच्या पालखी तळावर प्रत्येकी १५०० तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

तालुका आरोग्य विभागाच्या वतीने १४ स्थिर पथके, १७ दुचाकीवरील आरोग्य पथके, प्रति किलोमीटर अंतरावर एक रुग्णवाहिका अशा एकूण ३३ रुग्णवाहिका, ४ कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध केल्या असून १९० राखीव बेड्स, तज्ञ डॉक्टरांच्या नियुक्त्या, पालखी मुक्कामापूर्वीचे व मुक्कामानंतरचे स्वछता नियोजन, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावरून केलेली १५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती, १७ मंगल कार्यालये व ८ पेट्रोल पंप या ठिकाणी विश्रांतीगृह, पाणी व शौचालय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाच्या वतीने पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून विशेष सरंक्षण पथके तयार केली आहेत. महिलांसाठी २४ तास कार्यरत असणारे निर्भया पथक, पालखी मार्गावर बंद पडलेल्या वाहनांकरिता ८ ठिकाणी क्रेनची व्यवस्था, २ अग्निशमन दल, ५० अग्निशमन सिलेंडर्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पालखी सोहळ्याचे कंट्रोल रूम तहसील कार्यालयात स्थापित करण्यात आले असून ते १८ जून पासूनच सुरु केले आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे संपर्क असलेली पुस्तिका तयार केली असून या पुस्तिकेचे वाटप सर्व दिंड्यांमध्ये केले जाणार आहे.
फलटण नगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छता नियोजन, निर्मल वारी शौचालय नियोजन, पालखी तळावरील प्रकाश व्यवस्था, फलटण शहरातील पालखी मार्ग व पालखी मार्गावरील पाणीपुरवठा आदी सोयी-सुविधा निर्माण केल्या आहेत.
तालुक्यातील माऊलींचा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी प्रशासनाच्यावतीने केले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
