धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच मिळणार : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
फलटण (एकता दर्शन) : नरेंद्र मोदी देशातील सर्वसामान्यांना न्याय देणारे आणि विकासाची दृष्टी असणारे पंतप्रधान असल्याचे सांगत देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती म्हणून द्रोपदी मुर्मू यांना संधी देवून देशाच्या इतिहासात पाहिल्यांदाच आदिवासी समाजाला न्याय दिला असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. येथील दलित चळवळीतील कार्यकर्ते चंदकांत अहिवळे यांच्या शोकसभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड, विजय येवले, मधुकर काकडे, मुन्ना शेख, संजय निकाळजे, राजू मारुडा, युथ आरपीआय सातारा जिल्हा उपाध्यक्ष अभिलाष काकडे, दत्ता अहिवळे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. आठवले पुढे म्हणाले, सबका साथ सबका विकास हि भूमिका केंद्र सरकारची असून आदरणीय मोदी विकासाच्या दिशेने काम करीत आहेत. केंद्रातील माझ्या सामाजिक न्याय विभागाचे वार्षिक आर्थिक बजेट १ लाख ४२ हजार २४१ कोटी रूपयांचे असून देशातील दलित समाजासाठी या विभागामार्फत विविध योजना अमलात आणण्याचा प्रयत्न आमचे सरकार करीत आहे.

सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या राजकीय घडामोडींवर बोलताना ना. आठवले म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार आणि खासदारांचे दोन तृतीयांश बहुमत असल्याने त्यांच्या सरकारला कोणताही कायदेशीर धोका नाही. शिंदे सरकारची बाजू खंबीर असल्याने त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल, तरीही निवडणूक आयोगाच्या निर्णयाची वाट पहावी लागणार असल्याचे सांगत उध्दव ठाकरे यांना मी फार पूर्वीपासून सांगत होतो भाजपसोबत या मात्र ते आले नाहीत. एकनाथ शिंदे आले आणि सरकार अस्तित्वात आले. आता उद्धव ठाकरेंची वेळ संपली आहे. ठाकरे वेळेत आले असते, तर आज शिवसेनेतील फूट पहायला मिळाली नसती. असे ना. आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
