केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा फलटणमध्ये दोन दिवस
एकता दर्शन (फलटण) : भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा दि. ५ व ६ जानेवारी रोजी फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष अमोल सस्ते व मंडल अध्यक्ष पै. बजरंग गावडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
भाजपच्या 'मिशन २०२४' मोहिमेची सुरवात झाली आहे. आता हि मोहीम फलटणमध्येही सुरु होणार असून केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.अजयकुमार मिश्रा यांच्याकडे फलटणची जबाबदारी दिली असल्याचे सांगण्यात येते. याप्रसंगी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार बाळा भेगडे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, सातारा जिल्हा अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, लोकसभा प्रभारी माजी आमदार प्रशांत परिचारक, लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टी सज्ज असून महाराष्ट्रात ‘मिशन १४४’ची घोषणा केली आहे. त्याची सुरुवात महाराष्ट्रातील चंद्रपुर येथून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा करणार आहेत. याचाच एक भाग म्हणून फलटण मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बालेकिल्ल्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या उपस्थितीत दोन दिवसांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री ना. मिश्रा यांचे दि. ५ रोजी सायंकाळी ६ वाजता कोळकी येथील विश्रामगृहावर आगमन होणार आहे. दरम्यान कोळकीतील स्वस्त धान्य दुकानाला भेट देणार आहेत. सायंकाळी ६:३० वाजता येथील राष्ट्रीय पदक विजेती कु. देविका घोरपडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७:२० मिनिटांनी 'विचार परिवार समन्वय कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ७:४५ वाजता मारवाड पेठेतील श्रीकृष्ण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहेत. रात्री ८:२० वाजता कोळकी येथे लोकसभा कोअर कमिटीच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. यानंतर सोयीनुसार हॉटेल जॅक्सन इन येथे मुक्कामासाठी जाणार आहेत.
दि. ६ रोजी सकाळी ९ वाजता निंभोरे येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी, ९:१५ वाजता मलठण मधील श्री सद्गुरु हरिबुवा महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. १०:३० वाजता फलटण मधील प्रशासकीय कार्यालयांना भेटी, यानंतर जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक, ११:४५ वाजता रिंगरोड येथील जनऔषधी केंद्राला भेट, दुपारी १२:३० वाजता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेतील लाभार्त्यांसोबत येथील महाराजा मंगल कार्यालयात संवाद साधणार असून याच ठिकाणी दुपारी १:३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी २:१५ वाजता नगरसेवक सचिन अहिवळे यांच्या मंगळवार पेठेतील निवासस्थानी दुर्बल घटकातील नागरिकांशी संवाद साधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनला सदिच्छा भेट देणार आहेत. दुपारी ३ वाजता फरांदवाडी येथे जल जीवन मिशनचे भूमिपूजन करणार आहेत. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद करून पुण्याकडे मार्गस्थ होणार असल्याचे मंडल अध्यक्ष बजरंग गावडे व शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी सांगितले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
