केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या सत्काराची जय्यत तयारी
एकता दर्शन : फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघात कोट्यावधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांचा भव्य नागरी सत्कार फलटण येथे दि. २७ रोजी यशवंतराव चव्हाण हायस्कुलच्या मैदानावर आयोजित केला असून याप्रसंगी विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ ना. गडकरींच्या हस्ते होणार असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोळकी येथील शासकीय विश्रामगृहात स्थानिक पत्रकारांशी बोलतना दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून फलटण-बारामती रस्त्याची दुरावस्था आपण गडकरी यांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली होती याला अनुसरूनच ७५० कोटी रूपये खर्चाच्या कामाचे भूमीपुजन व फलटण तालुक्यातून जात असलेला ५५ हजार कोटी खर्चाचा पुणे-बेंगलोर मार्गाचे संगणकीकरणाद्वारे प्रारंभ ना. गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगत दहिवडी-सांगली या नवीन राष्ट्रीय महामार्गाची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता खासदार नाईक-निंबाळकर यांनी यावेळी वर्तवली आहे. आपण फलटण शहरासाठी बायपास मंजूर केला आहे या बायपासचे अर्धे काम झाले असून उर्वरित कामासाठी निधीची आवश्यकता असल्याने त्या निधीची मागणी यावेळी आपण ना. गडकरी यांचेकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

फेब्रुवारी महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथील विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असून याप्रसंगी निरा देवघर पाणीप्रश्न, धोम-बलकवडीची आठमाही पाणी योजना, नाईक बोमवाडीतील औद्योगिक वसाहतीचा शुभारंभ अशा विविध कार्यक्रम व योजनांसह काही लाख कोटी खर्चाची विकासकामे होताना दिसणार असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी सांगितले
फलटणच्या इतिहासातला पहिलाच भव्य सभामंडप :
केंद्रीय मंत्री ना. गडकरी फलटण येथे येणार असल्याने या कार्यक्रमाचे नियोजन व तयारी येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानावर युद्धपातळीवर सुरु आहे. यांत्रिक मशीनद्वारे लोखंडी खांब व साहित्यांचा वापर करून भव्य मंडप उभारण्यात येत आहे. यासाठी खास राजस्थानचे कारागीर मेहनत घेत आहेत. अनेक वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असा भव्य मंडप तयार होताना दिसत असल्याने फलटणकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
