माऊलींच्या स्वागतासाठी श्रीरामनगरी सज्ज
फलटण : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिनांक १ व २ जुलै रोजी फलटण शहरात दोन दिवसांच्या मुक्कामासाठी येणार असून फलटण तालुका व शहराच्या वतीने माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन शासकीय स्तरावर युध्दपातळीवर केले आहे.
लोणंद येथील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर आज दिनांक ३० रोजी पालखी सोहळा फलटण तालुक्यात प्रवेश करणार असून तालुक्यातील एकूण चार मुक्कामापैकी पाहिला मुक्काम तरडगाव येथे होणार आहे. त्यानंतर उर्वरित तीन मुक्कामापैकी दोन मुक्काम फलटण शहर व तालुक्यातील शेवटचा एक मुक्काम बरड येथे होणार आहे.
गुरुवार दि. ३० रोजी तरडगाव येथील चांदोबाचा लिंब येथे माऊलींच्या पालखी सोहळा मार्गावरील भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे पहिले उभे रिंगण होणार आहे. यानंतर पालखी सोहळा तरडगांव येथील पालखी तळावर मुक्कामासाठी थांबणार आहे.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा वैष्णवांचा मेळा भरला नव्हता. पालखी सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पाउलींच्या पादुका आळंदीहून एसटी बसने विठ्ठलाच्या भेटीला गेल्या, मात्र कोरोना आटोक्यात आल्याने शासनाने कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले असल्याने यावर्षी पुन्हा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाच्या भेटीला पायी चालले असून आळंदी ते पंढरपूर मार्गावर श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या फलटणनगरीत एक व दोन जुलै रोजी मुक्कामी येत असून त्यांच्या स्वागतासाठी पालिका महसूल व पोलीस प्रशासनाने नियोजनबद्ध तयारी केली आहे.
प्रभू श्रीराम नगरीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर मऊलींचा पालखी सोहळा दोन दिवस मुक्कामी येत असून महसूल, पोलीस, व आरोग्य या विभागांनी सर्व कामे करून घेतली असून तब्बल चार लाखाहून अधिक वारकरी पालखीसोबत येणार असल्याने पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, आणि महावितरण यासह इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही जबाबदारी घेत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली आहे.
विद्युत पुरवठ्याची खबरदारी
फलटण शहर उपविभाग (वीज) यांचेकडून विद्युत पुरवठा अखंडीत राहण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेत उच्चदाब व लघुदाब वाहिनीस अडथळा असणाऱ्या विविध ठिकाणच्या झाडांच्या फांद्या काढण्यात आल्या आहेत. उच्चदाब व लघुदाब वाहिनीचे अनेक ठिकाणचे धोकादायक पोल सरळ केले आहेत. रोहित्रांच्या बॉक्स दुरुस्तीसह रोहित्रांना आर्थिंग करण्यात आलेली आहे. गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व लघुदाब वाहिन्यांना स्पेसर्स बसविण्यात आले आहेत. पालखी मुक्कामादिवशी ११० कर्मचारी व एकूण १० अभियंत्यांची पुर्णवेळ नेमणूक भरारी पथकाव्दारे केली आहे.
फलटण नगरपालिकेकडून विविध सुविधा
लाखो वारकरी भाविक येणार असल्याने नगरपालिकेतर्फे १ हजार मोबाईल टॉयलेट, १ हजार शोष खड्डे शौचालय, महिलांसाठी स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, पालखी मार्गावर असलेल्या रस्त्याकडच्या साईडपट्ट्या भरून त्याचे सपाटीकरण यासह जर वीज खंडित झालीच तर विमानतळावरील पालखी तळावर २ मोठे जनसेट उपलब्ध केले आहेत. संपूर्ण शहरात दिवस फॉगिंग केले जाणार असून पिण्याच्या पाण्याचे ८ मोठे नळ उपलब्ध केले आहेत. तसेच मुघोजी महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण हायस्कूल, व मलठण याठिकाणी मोठ्या प्रमाणात वारकरी मुक्कामी असतात त्यामुळे तिथे प्रत्येकी ठिकाणी १०० टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...
