रणजितसिंह नाईक -निंबाळकरांचा मजबूत करा वाडा
मला मजबूत करायचा आहे रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा वाडा.! म्हणूनच मी आलो आहे माढा. महाविकास आघाडीचा बुरखा टराटरा फाडा.! राहुल गांधींच्या इंडिया आघाडीला गाडा. म्हणून मी आलो आहे माढा...अशा काव्यमय शब्दांच्या खास शैलीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी खासदार रणजितसिंह यांची श्रीपुर (ता.माळशिरस) येथील प्रचार सभा गाजवली.
लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार व विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ श्रीपुर (ता.माळशिरस) येथील आयोजित प्रचार सभेत ना.आठवले बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार बबनदादा शिंदे, आमदार प्रसाद लाड, राजकुमार नाना पाटील, सोमनाथ भोसले, सुजित थिटे, मिलिंद सरतापे, राहुल रेडे, शिवशरण, सुनील सर्वगोड, अशोक दादा चव्हाण, शामराव भोसले, भिमराव भुसणर, विक्रम लाटे आदी प्रमुख उपस्थित होते.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे निवडून येणे म्हणजे मोदी निवडून येणे. त्यांची ताकद हीच मोदींची केंद्रातील शक्ती असून त्यांच्या पाठीशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी ताकद उभी करून मोठ्या मताधिक्याने खासदारांना निवडून आणावे, असे आवाहन ना.आठवले यांनी यावेळी केले.
दरम्यान, महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह उपस्थित प्रमुख मान्यवरांनी भाषणे केली. या प्रचाराच्या सभेला महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
