माऊलींच्या पालखी सोहळ्यात भक्तीचा महापूर : टी एन जगताप
फलटण : आळंदी ते पंढरपूर मार्गावरील पालखी सोहळा भाविकांच्या भक्तीचा महापूर असून आषाढी वारीचा सांस्कृतिक ठेवा आहे. भागवत धर्माची भगवी पताका पंढरीच्या दिशेने ऊन-पावसाची तमा न करता वेगाने धावते आहे. राज्याच्या प्रत्येक भागातील माणसं पांडुरंगाचे सत्व जाणून वारीत विठ्ठलनामाचा जयघोष करताना दिसत असून पालखी सोहळा भाविकांच्या भक्तीचा महापूर असल्याचे मत ज्येष्ठ संत साहित्यिक तानाजी जगताप यांनी व्यक्त केले आहे.
टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत महाराष्ट्राच्या इतर भागासह मराठवाडा भागातील वारकरी या वारीत मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. वारीत विविध जाती, धर्म, आणि पंथाचे लोक सहभागी होतात. वारीकडे निधर्मी वारी म्हणून पाहिले जाते. वारी माणुसकीचे विपुल जग आहे. पालखी वारी समाजाला समतेचा आधार आणि आदर्श देत आहे. समस्त समाज भजन, किर्तन, भारूड यांच्या प्रबोधनातून घडतो आहे, असेही तानाजी जगताप यांनी सांगितले.
पंढरीच्या वारीचे स्वरूप आज बदलत असून समाजातील मानवी घटक वारीत सहभागी होताना दिसतात. संताचा विचार अवगत करतात, आणि अवगत विचारांचा प्रचार व प्रसार करतात. ज्ञानेश्वरी मधील भक्ती आणि ज्ञानमार्ग मानवतेचा विकास करेल. समाजाने अनेक क्रांत्या पाहिल्या परंतु संत विचार आजही माणसांना जोडण्यासाठी उपयुक्त ठरत असून त्याचे प्रमुख कारण वारीतील सहवास क प्रबोधन हे आहे, असे जगताप यांनी सांगितले.
Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...
