ब्रेकिंग न्यूज

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

12:03 AM आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के

Monday, 18 May 2026

Follow Us:

फलटणमध्ये आजपासून यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन

Share This Article:
फलटणमध्ये आजपासून यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन

एकता दर्शन (फलटण) : महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दोन दिवसीय १० वे ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन’ आज दि. २५ पासून सुरु होत आहे. गेली अनेक वर्षे महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेच्यावतीने फलटण मध्ये ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन’ हा उपक्रम आयोजित करण्यात येत असतो. हा उपक्रम यावर्षी श्रीराम एज्युकेशन सोसायटी व श्री सद्गुरू प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने होत असून दोन दिवस चालणारे हे साहित्य संमेलन सौ. वेणूताई चव्हाण साहित्य नगरीमध्ये संपन्न होणार आहे.

आज दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता फलटण शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचा शुभारंभ होणार आहे. फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी-बेडके, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, सह्याद्रीभैया कदम, अ‍ॅड.सौ.मधुबाला भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रंथदिंडीचा शुभारंभ होणार असून या ग्रंथदिंडीची सुरुवात श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्यापासून होणार आहे.

यानंतर सकाळी १०:३० वाजता संमेलनाचे उद्घाटन माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते होणार असून संमेलनाचे अध्यक्षस्थान किशोर बेडकिहाळ भूषविणार आहेत. दरम्यान, ग्रंथप्रदर्शनाचा शुभारंभ प्रसिद्ध वक्ते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे व राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे पुणे विभागीय उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी आमदार दीपक चव्हाण, राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, प्रकाश पायगुडे, विनोद कुलकर्णी, डॉ. सोपानराव चव्हाण, सौ.सुनिताराजे पवार, प्रमोद आडकर, उद्धव कानडे, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ, प्रदीप पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील महाविद्यालयांचे नियतकालिक, उत्कृष्ट दिवाळी अंक, उत्कृष्ट लेखक व कवि यांचा सन्मान, कोल्हापूर विभागातील प्रमुख साहित्य संस्थांचा सन्मान करण्यात येणार असून ‘यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कारा’चे वितरणही या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

उद्घाटन समारंभानंतर दुपारी ४ ते ५:३० या वेळेमध्ये ‘पत्रकारांचे मराठी साहित्यातील योगदान’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला असून या परिसंवादाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध विचारवंत व अभ्यासक डॉ.अशोक चौसाळकर भूषविणार आहेत. या परिसंवादामध्ये दैनिक पुण्यनगरीचे सातारा जिल्हाआवृत्ती प्रमुख विनोद कुलकर्णी व पुणे दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे सहभागी होणार आहेत.

संमेलनाचा दुसरा दिवस :

दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पद्मश्री लक्ष्मण माने यांची ‘यशवंतराव चव्हाण आणि माझी जडणघडण’ या विषयावर प्रकट मुलाखत, दुपारी १२ वाजता भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवीवर्षानिमित्त ज्येष्ठ कवी व साहित्यिक विसुभाऊ बापट यांचा ‘७५ वर्षांतील मराठी कवितांची वैभवशाली वाटचाल’ हा कार्यक्रम प्रसिद्ध कवी उद्धव कानडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

दुपारी २:३० वाजता संमेलनाचा समारोप महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे यावेळी प्रसिद्ध वक्ते व लेखक मधुकर भावे यांचे ‘यशवंतराव चव्हाण व आजचा महाराष्ट्र’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. याप्रसंगी मधुकर भावे यांना यावर्षीचा ‘यशवंतराव चव्हाण साहित्य गौरव पुरस्कार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे यावेळी भारती विद्यापीठाचे कार्यवाह व माजी राज्यमंत्री आमदार डॉ.विश्‍वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी संपन्न होणार आहे.

या संमेलनाला साहित्य प्रेमींनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संमेलन स्वागत अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष डॉ. सचिन सूर्यवंशी-बेडके, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ, राज्य साहित्य परिषद फलटण शाखेचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य शांताराम आवटे यांनी केले आहे.

Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...

महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....

संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...

दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्‍या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...