देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये जाहीर सभा
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दि. १७ रोजी फलटण दौऱ्यावर येत असून विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे सांगत गेली अनेक वर्ष प्रलंबित असणारा नीरा-देवघर कालव्याच्या कामाचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याने माजी खासदार स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी पाहिलेल्या कामांची स्वप्नपूर्ती होणार असल्याची माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण दौऱ्यावर येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कोळकी (ता.फलटण) येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटण नगर परिषदेचे गटनेते अशोकराव जाधव, फलटण विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सचिन कांबळे, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांच्यासह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या दुष्काळी तालुक्यातील शेती पाण्याचा कायमचा प्रश्न सुटावा यासाठी माजी खासदार स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्ष सत्यात उतरत असून फलटण-बारामती रेल्वे प्रकल्पामुळे दक्षिणेकडून दिल्लीला जाणारा रेल्वे मार्ग फलटणवरून जाणार असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी यावेळी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे या दुष्काळी भागातील ७५ गावांना धोम बलकवडीचे पाणी आता बारमाही मिळणार असून अतिरिक्त ०.९३ टीएमसी व झिरो वॉटरचे अर्धा टीएमसी पाणी फक्त फलटण तालुक्याला मिळणार आहे. नीरा देवघर प्रकल्पासाठी ३९७५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ३ ते ४ महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून व प्रयत्नांमुळे फलटण येथे नवीन एमआयडीसी सुरू केली जाणार आहे. त्या एमआयडीसीचे उद्घाटनही दि. १७ रोजीच होणार आहे. फलटणकरांना दिलेल्या विकास कामांच्या वचनांची प्रत्यक्ष पूर्ती होताना दिसणार असल्याचे सांगत यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणावर देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा दि. १७ रोजी दुपारी ३ वाजता होणार असून या सभेला माढा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी खासदारांनी केले.
दिग्गज नेता भाजपमध्ये प्रवेश करणार
येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात होणाऱ्या जाहीर सभेत फलटण तालुक्यातील ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असून यावेळी अन्य लोकांचाही भाजपामध्ये प्रवेश होणार आहे. देवेंद्र फडणवीस फलटणमध्ये येणार असल्याने तालुक्यातील नागरिकांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी केले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
