फलटण महसूल विभागातील अव्वल कारकून लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
एकता दर्शन (फलटण) : येथील महसुल विभागाच्या रेकॉर्ड कार्यालयातील अव्वल कारकुन व त्याचा एक खाजगी साथीदार अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडुन त्यांच्या विरूध्द येथील फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अलगुडेवाडी (ता. फलटण) येथील तक्रारदाराने आपल्या घराकडे जाणारा कच्चा रस्ता पक्का मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी रेकॉर्ड कार्यलयातील अव्वल कारकुन पी.एन. जाधव (रा. फलटण) यांच्याकडे केली होती. दरम्यान जाधव यांनी ग्रामपंचायतदप्तरी नोंद करून तक्रार नसल्याचे प्रतिज्ञापत्र करून देण्यासाठी तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची मागणी केली होती, त्यावेळी तक्रारदाराने जाधव यांच्या मागणीची तक्रार सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
त्यानुसार, दि. २० रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अधिकारी सुजय घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन राऊत, विक्रम पवार, विनोद राजे, संभाजी काटकर यांच्या पथकाने पांडुरंग नामदेव जाधव व त्याचा खाजगी साथीदार सपकाळ या दोघांना दोन हजार रूपये घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी जाधव व सपकाळ यांच्या विरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...
