शरद पवार यांच्या चिठ्ठीने फलटण लोणंद बारामती रेल्वेला मंजुरी : आमदार रामराजे नाईक निंबाळकर
एकता दर्शन : फलटण लोणंद बारामती रेल्वेला त्याकाळातील लोकसभा संसदीय कामकाजच्यावेळी जाफर शरीफ मंत्री असताना शरद पवार यांनी सहज पाठवून दिलेल्या चिठ्ठीवरून मंजुरी मिळाली असल्याचे मत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका सुभद्रराजे नाईक निंबाळकर आदी प्रमुख उपस्थित होते.
आमदार रामराजे म्हणाले, कै. हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचं रेल्वेसंदर्भातील संसदेतील भाषण मी ऐकलं परंतु माझी माहिती अशी आहे कि, लोणंद बारामती हा रेल्वेमार्ग जाफर शरीफ मंत्री असताना शरद पवारांनी सहज पाठवून दिलेल्या चिट्ठीद्वारे बजेटमध्ये आला. माझ्या दृष्टीने रेल्वेला प्राधान्य नव्हते, माझ्या दृष्टीने माणसांच्या खिशात पैसा पाहिजे तरच ते रेल्वेचे तिकीट काढू शकतात असे सांगत रेल्वे आडवायला आम्हाला वेळ लागला नसता असेही आमदार रामराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
गेले पंधरा दिवस माढ्याचे खासदार निंबाळकर यांनी पाणी प्रश्नावर कधी नव्हे ते बोलणे सुरु केले आहे. परंतु ११.८५ टीएमसी क्षमता असणाऱ्या निरा देवघर धरणाच्या ६६ किलोमीटर कालव्यांच्या निविदा त्याकाळात काढल्या असल्याचे निदर्शनास आणून देत धोम बलकवडीमुळेच फलटण तालुक्यातील साखर कारखाने चालत असल्याचे आमदार रामराजे यांनी सांगितले.
प्रशासकीय व राजकीय पातळीवर संमिश्र कष्ट घेऊन आम्ही पुनर्वसनाची कामे केली, प्रकल्पग्रस्तांना जमिनी सोडायला लावण्याचे कष्ट आम्ही घेतले. मग आपण कसले जलनायक आहात. माझ्या दृष्टीने हे जलनायक नसून खलनायक आहेत. फलटण तालुक्यात आलेल्या पाण्याच्या श्रेय माझेच असून खासदारांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढू नयेत अशी टीका आमदार रामराजे यांनी खासदार रणजितसिंह यांच्यावर केली.
निरा देवघरचं पाणी जेव्हा सुरु होईल त्यावेळी बचतीचे पाणी फलटणला मिळाले नाही तर फलटण तालुक्यावर अन्याय होईल. सांगोल्याला पाणी द्या पण तुम्ही नवीन पाण्याचा शोध घ्या. दुसऱ्याच्या कष्टावर किती दिवस मुजोरपणा करणार आणि खोटं बोलणार. काम न करता हिमालयायेवढ्या महत्वकांक्षा का ठेवता. भ्रम निर्माण करून मतं मिळवणाऱ्या भ्रमिष्ट माणसावर मी पुन्हा बोलणार नाही असे स्पष्ट करत पक्षाच्या नावाने मतं न मागता खासदारांनी स्वतःच्या नावावर मतं मागवीत असे आव्हान आमदार रामराजे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
