कारगिल युद्धातील शहिदांना श्नध्दांजली
फलटण : येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमिर खान मेटकरी यांच्या पुढाकारातून व राष्ट्रीय एकात्मता विचार मंच आणि जनशक्ती विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त सहकार्यातून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्नध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
देशसेवेसाठी कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या स्मरणार्थ व युद्धातील विजयाचे स्मरण म्हणून 'विजय दिन' कार्यक्रम साजरा करण्याची परंपरा मेटकरी यांनी कायम राखली आहे.
या कार्यक्रमासाठी मुंबई हेल्थ फाउंडेशनच्या प्रमुख आशाताई जगताप, पुणे येथील भारतीय एकात्मता मंचचे ईस्माईल शेख, बशीरभाई शेख, ॲड. दिलीप शिर्के, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सिध्दार्थ दैठणकर उपस्थित होते.
प्रारंभी येथील विजयस्तंभ परिसरातील 'अमर जवान स्तंभा'स मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर मुधोजी हायस्कूलमधील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून विजयस्तंभाला मानवंदना दिली. दरम्यान आशाताई जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
Sponsored
संबंधित बातम्या
महात्मा एज्युकेशन सोसायटीत भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटी संचालित चतुराबाई शिंदे बालक मंदिर, श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळा आणि आचार्य...
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
