माऊलींच्या पालखी सोहळ्याचे श्रीराम नगरीत शाही स्वागत
होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥ काय करावीं साधनें । फळ अवघेचि येणें ॥ अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥ तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥
या संत अभंगवाणी प्रमाणे सारे घरदार सोडून संसाराची कोणतीही आठवण होवू न देता पालखी सोहळ्याच्या तीर्थयात्रेत तल्लीन झालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हरिनामाचा गजर करीत एक दिवसाच्या मुक्कामाकरिता ऐतिहासिक फलटण नगरीत विसावला दरम्यान पालखी सोहळ्याने श्री प्रभू रामचंद्राच्या नगरीत प्रवेश करताच शहरवासीयांनी पालखी सोहळ्याचे शाही स्वागत केले. पालखी सोहळा पुढे श्रीराम मंदिर समोर आल्यानंतर फलटण राज घराण्याच्या वतीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी स्वागत केले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा तरडगाव येथील मुक्काम आटोपल्यानंतर दिनांक २१ रोजी सकाळी सोहळ्याने फलटण शहराच्या दिशेने प्रयाण केले. हरिनामाच्या गजरात पुन्हा नवा उत्साह घेऊन वारकऱ्यांनी आपल्या दिंड्या नंबर प्रमाणे लावून विठुरायाच्या जयघोषात पुढे मार्गस्थ केल्या. टाळ मृदुंग, हरिनामाचा गजर करत पालखी सोहळा काळज येथे आला. यावेळी भाविकांच्या दर्शनासाठी माऊलींची पालखी दत्त मंदिर परिसरात थांबविण्यात आली. दरम्यान काळज व परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी एकच झुंबड उडवली. काळज येथून पालखी सोहळा सुरवडी येथे विश्रांतीसाठी थांबविण्यात आला. या ठिकाणी सुरवडी ग्रामपंचायतच्या वतीने पालखी सोहळ्यातील कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ फेटा देऊन यथोचित सत्कार केला. दरम्यान सुरवडी, साखरवाडी, जिंती पंचक्रोशीतील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी रांगा लावल्या. यानंतर पालखी सोहळा निंभोरे या ठिकाणी दुपारच्या विसावासाठी थांबविण्यात आला. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या शेतामध्ये सावली आणि पाण्याची व्यवस्था पाहून महिला भगिनींनी स्वयंपाकास सुरुवात केली. टाळ मृदुंग आणि भजन साथीने जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर पालखी सोहळा फलटण शहराच्या दिशेने पुढे सरकला.

पालखी सोहळा फलटण शहराच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागला. शहराच्या सरहद्दीवर फलटण नगरपालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, महसूल व पोलीस प्रशासन आदी संस्थांसह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा, कृषी, सहकार, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर विठ्ठल भक्तांनी पालखी सोहळ्याचे ऐतिहासिक नगरीत शाही स्वागत केले.
संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे प्रत्येक जण वारकऱ्यांच्या सेवेत तल्लीन झाला होता. माऊलींचा पालखी सोहळा फलटण नगरीत आल्यानंतर पुढे पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी वारकऱ्यांमधला उत्साह मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. तोच नवीन उत्साह घेऊन वारकरी आपल्या देवताला भेटण्यासाठी फलटणकरांचा निरोप घेऊन दि.२२ रोजी सकाळी जिल्ह्यातील अखेरच्या मुक्कामी बरड गावाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
