मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी फलटणमध्ये रंगणार कुस्त्यांचा आखाडा
फलटण : फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १२ रोजी सायंकाळी ४ वाजता येथील यशवंतराव चव्हाण हायस्कुलच्या मैदानावर कुस्त्यांचा आखाडा आणि आमदार महेश शिंदे व राजेश क्षीरसागर यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती फलटण तालुका शिवसेनाप्रमुख नानासाहेब उर्फ पिंटूशेठ पोपटराव इवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी कोळकी (ता.फलटण) येथील इरिगेशन बंगल्यावरील शासकीय विश्रामगृहातील आयोजित पत्रकार परिषदेत नानासो इवरे बोलत होते. यावेळी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष नंदिनी गायकवाड, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पवार, हेमंत सुतार, शहर प्रमुख निलेश तेलखडे उपस्थित होते.
आमदार महेश शिंदे यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी व राजेश क्षीरसागर यांची राज्य नियोजन महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्याहस्ते करण्यात येणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून करमाळाचे माजी आमदार नारायण आबा पाटील उपस्थित राहणार असल्याचे इवरे यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास ठाण्याचे माजी महापौर व शिवसेना सचिव संजय मोरे, सातारा संपर्कप्रमुख शरद कणसे, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके), शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, सोलापूर जिल्हाप्रमुख संजय कोकाटे, युवा सेनेचे सातारा जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, महिला जिल्हा संघटक सौ.शारदा जाधव, उपजिल्हाप्रमुख अविनाश फडतरे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून फलटण शहर व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन फलटण तालुका शिवसेना व युवासेना महिला आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
