श्रीमंत संजीवराजेंची पालखीतळ स्वच्छता मोहीम फत्ते
एकता दर्शन: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या फलटण येथील मुक्कामानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखीतळ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शहरातील विविध संस्था सहभागी झाल्या होत्या. स्वच्छतेच्या कामासाठी अनेकांचे हात पुढे आल्याने काही वेळातच पालखी तळ चकाचक झाल्याचे चित्र दिसत होते.
फलटण येथील पालखी तळ व परिसर स्वच्छतेचे काम प्रतिवर्षी करण्यात येत असते. श्रीमंत संजीवराजे यांच्या पुढाकाराने स्वच्छता परंपरा राखण्यात फलटणकर नेहमीच कार्यरत असतात. यावर्षीही पालखी तळ स्वच्छ करण्याची परंपरा फलटणमधील सेवाभावी संस्थांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे कायम राखली आहे.

फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय, मुधोजी हायस्कूल, शेती शाळा, ब्रिलियंट इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, फलटण नगरपालिका मधील अधिकारी कर्मचारी, आजी माजी सदस्य, सहकारी संस्थाचे पदाधिकारी यांचे सह विविध स्वंयसेवी संस्थाचे पदाधिकारी यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या स्वच्छता मोहिमेच्या आवाहनास प्रतिसाद देत प्रत्यक्ष सक्रिय होवुन स्वच्छता मोहिम फत्ते केली.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
