ब्रेकिंग न्यूज

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

12:03 AM आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के

Monday, 18 May 2026

Follow Us:

माढ्याच्या विकासासाठी सरकार खासदारांच्या पाठीशी : देवेंद्र फडणवीस

Share This Article:
माढ्याच्या विकासासाठी सरकार खासदारांच्या पाठीशी : देवेंद्र फडणवीस

एकता दर्शन : माढा लोकसभा मतदारसंघातील विकासकामे खासदार रणजितसिंह यांच्या कार्यकाळात पूर्वीपेक्षा जास्त झाली असून आगामी काळातही या मतदारसंघातील विकासकामे पूर्ण क्षमतेने केली जाणार असल्याचे सांगत माढा लोकसभा मतदारसंघातील कामासाठी आमचे सरकार खासदार रणजितसिंह यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाणे, वाठार पोलीस ठाणे व वसाहत या नूतन इमारत बांधकामांचे ऑनलाईन उद्घाटन बरड (ता.फलटण) येथे करण्यात आले याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छ.उदयनराजे भोसले, आ.प्रवीण दरेकर, आ.जयकुमार गोरे, आ.शिवेंद्रराजे भोसले आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना घरे बांधून दिली पाहिजेत हि शासनाची भूमिका असल्याने गृहप्रकल्प कामांना शासन प्राधान्य देत आहे. माढ्यात जे झाले नाही ते आम्ही केले. यासाठी खासदार निंबाळकर यांचा आमच्याकडे सतत पाठपुरावा असतो. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कामे होत आहेत. या पुढेही जिल्ह्यातील रस्ते, सिंचन प्रकल्प, रेल्वे यासह अन्य विकास योजनांना आवश्यक निधी शासन देणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री म्हणाले, वारकऱ्यांसाठी विमा योजना आणून आम्ही उत्तरदायित्व निभावले आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सरकार काम करीत आहे. फलटण शहर, ग्रामीण आणि वाठार स्टेशन पोलीस ठाणे व वसाहतीसाठी सरकारने १३ कोटी ६४ लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. अंतर्गत डांबरी रस्ते, संरक्षक भिंत, भूमिगत पाण्याच्या टाक्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग , पथदिवे, अंतर्गत व बाह्य सोलर प्रणाली, जनरेटर सेट, सेफ्टी टॅंक, अग्निशमन प्रणाली, ट्रॉन्सफॉर्मर, परिषद हॉल, मिटींग हॉल, आदी सुविधांचा समावेश पोलीस ठाणे व वसाहत प्रकल्पामध्ये केला जाणार आहे.

खासदार रणजितसिंह म्हणाले, आपण निवडणूक काळात मतदारांना जे शब्द दिले होते, त्या सर्व कामांची पूर्तता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असल्याने माढा लोकसभा मतदारसंघातील विकासाचे खरे शिल्पकार देवेंद्र फडणवीस साहेब असल्याचे सांगत धोम बलकवडी, नीरा देवघर या धरणांची प्रलंबित कालव्यांची कामे, फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग, विविध रस्ते व विकासकामे करण्यासाठी केंद्र व विद्यमान राज्य सरकारने भरीव सहकार्य केले आहे. आगामी काळातही आपण विकासकामांसाठी कमी पडणार नसल्याची ग्वाही खासदार रणजितसिंह यांनी यावेळी दिली.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सर्व सोयी सुविधा निर्माण करून दिल्यास त्यांच्याकडून चांगले काम होते. जिल्ह्यात पोलीस विभागामार्फत महिला सुरक्षाबाबत चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे. जिल्ह्यातील ढेबेवाडी, औंध, मसूर यासह अन्य १३ गृहनिर्माण प्रकल्प प्रलंबीत आहेत. गृह विभागाने निधी उपलब्ध करून सदरचे प्रकल्प मंजूर केले पाहिजेत.

प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मान्यवरांच्या हस्ते पोलीस ठाण्यांच्या नूतन इमारतींचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे व वसाहतीच्या नूतन इमारत बांधकामाची चित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी केले.

Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...

समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...

षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...

ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...

ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...