पोंभुर्ले येथे आज राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
एकता दर्शन (फलटण) : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’च्या वतीने देण्यात येणार्या राज्यस्तरीय ३० व्या ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण आज दि. ६ रोजी सकाळी १०:३० वाजता पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे पत्रकार कल्याण निधीने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात समारंभपूर्वक होणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी दिली आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण, कुडाळ (जि.सिंधुदुर्ग) येथील ज्येष्ठ राष्ट्रीय कलावंत पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी कोल्हापूर येथील विभागीय माहिती कार्यालयातील उपसंचालक डॉ.संभाजीराव खराट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ हे भूषविणार आहेत.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, पोंभुर्ले-जांभे-देऊळवाडी ग्रामस्थ, व जांभेकर कुटुंबीय यांच्या सहकार्याने पत्रकार दिनानिमित्त राज्यस्तरीय दर्पण पुरस्कारांचे वितरण केले जाणार असून यावेळी ‘दर्पण’ सभागृहात बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले जाणार असल्याचे मांडके यांनी सांगितले.

पुरस्काराचे हे ३० वे वर्ष असून या समारंभात सन २०२२च्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘दर्पण पुरस्कारां’चे वितरण होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार सौ.शीतल करदेकर (मुंबई), राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार कोकण विभाग शैलेश पालकर (पोलादपूर) व सुरेश कौलगेकर (वेंगुर्ला), पश्चिम महाराष्ट्र विभाग अनुराधा कदम (कोल्हापूर), उत्तर महाराष्ट्र विभाग जयप्रकाश पवार (नाशिक), विदर्भ विभाग डॉ.राजेंद्र मुंढे (वर्धा), मराठवाडा विभाग प्रल्हाद उमाटे (नांदेड), विशेष ‘दर्पण’ पुरस्कार सदाशिव मोहिते (फलटण) व किरण बोळे (फलटण) यांचा समावेश आहे.
‘दर्पण’कारांच्या जन्मभूमीत ‘दर्पण’ स्मारक सभागृहात आयोजित केलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमास ‘दर्पण’कारांना अभिवादन करण्यासाठी राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, माध्यमप्रेमी नागरिक व पोंभुर्ले पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व कृष्णा शेवडीकर यांनी केले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...
