'मनशक्ती'च्या उपक्रमांचा विनामूल्य लाभ घ्यावा
फलटण : मनशक्ती केंद्र (लोणावळा) आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर आय आय टी इन्स्टिट्यूट (फलटण) या सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी येथील उपळेकर महाराज मंदिरात मनशक्ती ग्रंथसाहित्य प्रदर्शन सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार असून या प्रदर्शनाचा व मनशक्ती केंद्रातील अन्य उपक्रमांचा विनामूल्य लाभ विद्यार्थी, युवक, पालक, नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मनशक्ती केंद्राच्यावतीने पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.
मनशक्ती केंद्राच्यावतीने फलटण येथील उपळेकर महाराज मंदिरात दोन दिवस भरविण्यात आलेल्या मनशक्ती ग्रंथ प्रदर्शनादरम्यान सर्वांगीण यश व आरोग्यासाठी अन्य उपक्रम प्रात्यक्षिकांसह राबविले जाणार असून यामध्ये ८ ते १८ वर्षे वयोगटातील मुले व युवकांसाठी, १८ ते ८० वयोगटातील तरुण, प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांसाठी अभ्यास-ताण मापन चाचणी, स्थिरता चाचणी, मेंदू क्षमता चाचणी, मेंदू प्राबल्य, नैराश्य चिंता ताण, व्यक्तिमत्व चाचणी आदी चाचण्या प्रात्यक्षिकांसह घेण्यात येणार असल्याचे सांगत व्यक्तिगत मार्गदर्शनही केले जाणार असल्याचे मनशक्ती केंद्राचे सुरज कारंडे, सुषमाताई डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मनशक्ती केंद्रातील विविध उपक्रमांचा विनामूल्य लाभ सर्व विद्यार्थी, पालक, नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सोपानकाका शिंदे यांनी केले आहे. यावेळी सीमाताई कारंडे, मनीषा शेखर कांबळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आयआयटीचे शेखर कांबळे यांच्यासह फलटण तालुक्यातील मनशक्ती केंद्रअंतर्गत काम करणारे प्रमुख साधक उपस्थित होते.

Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
