खा.रणजितसिंह बहुजनांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या मतदार संघात केंद्रशासनाच्या राबविलेल्या सर्वाधिक योजना, कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून मिळणारी समानतेची वागणूक, त्यांच्याबरोबर असणाऱ्या तरुण वर्गाला मिळणारा योग्य न्याय, सार्वजनिक कामाच्या विकासाची दृष्टी, याशिवाय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व असल्याने आपण भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया वस्ताद चंदन काकडे यांनी व्यक्त केली.
आपण गेली अनेक वर्ष सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असून जो अनुभव आला तो न सांगण्यासारखा आहे. तरुणांना योग्य विचार दिला पाहिजे. तरुणांचे नेतृत्व वाढले पाहिजे. राजकारणात त्यांना संधी मिळाली पाहिजे. मात्र अशा गोष्टी यापूर्वी घडत नसल्याचे निदर्शनास आल्याने आपण भाजप सोबत राहणार असल्याचे काकडे यांनी बोलताना सांगितले.
शहर, तालुक्यातील सामाजिक व राजकीय परिस्थिती ही विकासाच्या दृष्टीने अन्य तालुक्यापेक्षा मागे आहे. मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार झाल्यापासून अन्य तालुक्यापेक्षा आपल्या तालुक्याने विकासकामात गती घेतली आहे. गेल्या अनेक वर्षात जे दिसले नाही ते मागील चार वर्षांमध्ये दिसत आहे. न होणारी कामे सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्गी लावली आहेत. त्या विकासकामांना प्रेरित होऊन माझ्यासारखे सामान्य कार्यकर्ते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत जाण्याचा विचार करत असून आज मी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगत भविष्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार काकडे यांनी व्यक्त केला.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
