शिंदे कुटुंबाची काळजी घेऊ
फलटण : सुभाषराव शिंदे पहिल्यापासूनच आमच्याबरोबर राजकारणात होते. फलटणमधून त्यांनी फार मोठे आम्हाला सहकार्य केले असून ते कायम स्मरणात राहणार आहे. फलटण तालुक्याच्या राजकीय पटलावरील ते एक धाडसी, निर्भय, आक्रमक व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने आम्हालाही अतीव दुःख होत आहे. सुभाषराव शिंदे यांचा आम्हाला असणारा राजकीय, सामाजिक सहकार्य व मनापासूनचा पाठिंबा कधीही विसणार नसून शिंदे कुटुंबीयांची आम्ही यापुढे काळजी घेणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचे निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी फलटण येथील "जिद्द" बंगल्यावर आले होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दत्तामामा भरणे, आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते.
सुभाषराव शिंदे यांचा "जिद्द" बंगला गेल्या अनेक वर्षांपासूनच राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला असून गेल्या २५-३० वर्षात या बंगल्यावर राज्यातील विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी स्व.शिंदे यांना भेटत असल्याच्या आठवणी पुन्हा एकदा पवार यांच्या भेटीने ताज्या झाल्या असल्याचे उपस्थित अनेकांनी यावेळी सांगितले.

शिंदे परिवाराच्या सांत्वनानंतर खासदार रणजितसिंह आणि अजितदादा यांच्यात गुफ्तगू सुरू झाली. त्या दोघांमध्ये काय बोलणे सुरू होते हे स्पष्ट झाले नसले तरी साखर कारखान्याचा प्रश्न, लोकसभा निवडणूक, आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या सद्य परिस्थितीवर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजत आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
