ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार
शिंदेवाडी (ता.फलटण) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शरद पवार यांचेवर गेली अनेक वर्षांपासून निष्ठा ठेवणारा व समाजात प्रामाणिक काम करणारा निष्ठाप्रेमी तारा म्हणून ओळख असणारे सुभाषराव शिंदे यांच्यावर हजारो लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकारणात अनेकांना मोठे करणारा, तरुणांना प्रेरणा व ऊर्जा देणारा, धाडसी, आक्रमक परखड बोलणारा, संकटाशी दोन हात करीत लढणारा अशा शब्दात स्व. शिंदे यांच्या अंत्यसंस्कारवेळी अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित केली.
दि.१३ रोजी दुपारी ४ वाजता सुभाषभाऊंनी पुणे येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली होती. त्यांचे पार्थिव पुण्याहून दि.१४ रोजी पहाटे फलटण येथील 'जिद्द' बंगल्यावर आणण्यात आल्यानंतर अंतिम दर्शनासाठी फलटण शहर व तालुकावासीयांनी मोठी गर्दी केली होती. अंतिम दर्शनानंतर शिंदेवाडी येथील त्यांच्या मूळ गावी हजारोंच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अच्युतराव खलाटे, ॲड.नरसिंह निकम यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वर्गीय सुभाष भाऊ यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अंत्यविधी संस्कारप्रसंगी प्रल्हादराव साळुंखे पाटील, डि.के.पवार, दिलीपसिंह भोसले, अभयसिंह जगताप, रविंद्र बेडकिहाळ, महेंद्र सूर्यवंशी बेडके, धनंजय साळुंखे पाटील यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामीण भागातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
