फलटण बाजार समितीच्या १४ जागांसाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात
एकता दर्शन : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी ८१ उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आले असून १८ जागांसाठी हि निवडणूक होत असून पैकी ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित १४ जागांसाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत.
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून अक्षय शामराव गायकवाड, इतर मागास प्रवर्गातून तुळशीराम शिंदे, हमाल मापाडी मतदारसंघातून निलेश कापसे, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून संतोष जगताप यांचा समावेश आहे.
१८ जागांपैकी ४ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १४ जागांसाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अटळ ठरली आहे. दिनांक २१ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार असून यावेळी चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.
दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल व त्याचदिवशी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांनी दिली.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
