माझ्या वडिलांना न्याय द्या ; दिगंबर आगवणेंच्या मुलाची आर्त हाक
फलटण : आयुर उद्योग समुहाचे सर्वेसर्वा उद्योजक दिगंबर आगवणे यांनी आज सकाळी लोणंद पोलीस ठाण्यातील कोठडीमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून आगवणे यांना लोणंद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान आगवणे यांच्या मुलाने व्हॉट्स ॲपव्दारे माझ्या वडिलांना न्याय मिळावा अशी आर्तहाक दिली आहे.
दिगंबर आगवणे पोलिसांच्या चक्रव्यूहात गेली अनेक दिवसांपासून अडकल्याने त्यांना विविध गुन्ह्यांप्रकरणी पोलीस कोठडीची हवा खावी लागत आहे. एका गुन्हाप्रकरणी सध्या लोणंद पोलीस ठाण्यातील कोठडीत असताना आगवणे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर आगवणेंना उपचारासाठी लोणंद येथील खाजगी रुग्णालयात दाखले केले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिगंबर आगवणे यांचा मुलगा तुषार याने माझ्या वडिलांना न्याय मिळावा अशी आर्त हाक मोबाईल व्हॉट्स ॲपव्दारे दिली आहे.
दिगंबर अगावणेंच्या मुलाचा व्हॉट्सॲप संदेश
मी - तुषार दिगंबर आगवणे
दि : २९/०८/२०२२ रोजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे सहकारी व पोलीस यांनी माझ्या वडिलांना खूप त्रास दिला आहे. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून माझ्या वडिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आता त्यांची अवस्था खूप critical आहे. आमच्यासाठी plz सर्वांनी आवाज उठवावा. जर माझ्या वडिलांना काय झाले तर सर्वस्व जबाबदार खासदार रणजितसिंह व पोलीस यंत्रणा राहील. Plz request आहे माझ्या वडिलांना न्याय द्या...
Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...
