स्वर्गीय हणमंतराव पवार सहकारातील कर्तृत्वान व्यक्तिमत्व
एकता दर्शन : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील पवारवाडी (आसू) गावचे सुपुत्र सहकारमहर्षी स्वर्गीय हणमंतराव पवार (अण्णा) यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या सामाजिक, राजकीय व संस्थात्मक कार्याचा घेतलेला आढावा..
वडील स्वर्गीय दिनकरराव पवार व मातोश्री यांच्या सामाजिक आचार, विचार आणि संस्कारातून घडलेले अण्णांचे व्यक्तिमत्व अवघ्या तालुक्यालाच नव्हे, तर जिल्हा आणि राज्यातील विविध विकासाच्या क्षेत्रांना आकर्षित करणारे होते. पवारवाडीच्या समृद्ध मातीने ज्यांना घडवले, बालवयात शिक्षणाचे धडे दिले, अशा मातीला व समाजाला केंद्रबिंदू मानून सामाजिक उतरदायित्व म्हणून समाजात अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहणारे अण्णा म्हणून त्यांच्याकडे तालुक्याचे लक्ष होते.
तालुक्यात सहकाराचा पाया मजबूत करण्यासाठी साखर कारखान्यापासून ते स्थानिक संस्थांपर्यंत अण्णांनी स्वतः पारदर्शी कारभार करत सहकाराचे एक आदर्श मॉडेल तयार केले. विविध संस्थाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक व शेतकरी वर्गाचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी ते सतत कार्यतत्पर राहत होते.
ग्रामपंचायत, खरेदी-विक्री संघ, दूधसंघ, साखर कारखाना, श्रीराम बझार, शिवनेरी सहकारी कुक्कुटपालन संस्था, मोटार मालक संघ, मुधोजीराजे मेडिकल फाउंडेशन या प्रमुख संस्थासह अन्य संस्थाची तालुक्यात उभारणी करून स्वर्गीय हणमंतराव पवार यांनी तालुक्याला समृध्दी व विकासाची दिशा दिली. गाव खेड्यातील पायाभूत सुविधांच्या चौफेर विकासाची दृष्टी असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे स्मरण आजही होताना दिसत आहे.
श्रीराम सहकारी कारखान्याचे चेअरमन असताना त्यांनी ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या आर्थिक हितासाठी के.टी. वेल्स कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, पाण्याच्या लिफ्ट योजना, बोअरवेल्स अशा अनेक योजना त्यांनी कार्यान्वित केल्या होत्या. राजकीय क्षेत्रात दमदार पाऊल टाकत अण्णांनी तालुक्याच्या राजकारणात आपले स्वतंत्र अस्तित्व उभा करून दबदबा निर्माण केला होता. त्यांनी राजकारण फारसे केले नसले तरी त्यांच्या राजकारणाची मांडणी मात्र आदर्शवत होती. स्वतंत्र विचारसरणी, रूबाबातले राहणीमान, सर्वसामान्याचे हित जोपासणे, शासकीय लाभ उपेक्षित गरीब जनतेपर्यंत पोहचविणे आदी गुण त्यांच्या व्याक्तीमत्वात होते. त्यामुळे प्रभावी, दमदार, टिकावू काम करणाऱ्या व सर्वसामान्यांना स्थान देणाऱ्या अण्णांची आठवण आजही अनेकांना झाल्याशिवाय राहत नाही.
समाजातील कार्यकर्त्यांना निरपेक्ष भावनेतून आर्थिक मदत करणे हा त्यांचा स्थायी स्वभाव होता. त्यांच्या उच्च विचारसरणीतून आदर्शवत कार्यकर्तृत्वाची छाप जनसामान्यांवर नकळतपणे पडत असायची. समोरच्या व्यक्तीला जिव्हाळ्याने बोलून आपलंस करणे हे त्यांच्या वागण्यातील विशेष कसब होते. अण्णांनी निर्माण केलेल्या तत्कालीन संस्था आजही सुरू आहेत. आजही त्या संस्थांचे पारदर्शी व्यवस्थापन कोट्यावधी रुपयांची उलाढाल करत असून संस्थेतील कार्यरत असणाऱ्या कामगारांचे हित हेच वैशिष्ट्य आजही ठळकपणे दिसते. म्हणूनच स्वर्गीय हणमंतराव पवार यांची आठवण तालुक्याला झाल्याशिवाय राहत नाही.
सहकारमहर्षी स्वर्गीय अण्णांच्या २५ व्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
