फलटणमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीने संविधान दिन साजरा
एकता दर्शन (फलटण) : २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान देशाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान देशाला बहाल केल्याच्या पार्श्वभूमीवर हा दिवस संविधान दिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून आज फलटण शहरात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
सकाळी ११ वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, तहसीलदार समीर यादव, नगरपालिका मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, प्रा. रमेश आढाव, डॉ. पी.एच. कदम, डॉ. प्रभाकर पवार, अमित भोईटे, ॲड. अनिकेत अहिवळे, अमीर शेख, सचिन अहिवळे, सुशांत अहिवळे, प्रतीक गायकवाड, मेहजबीन तांबोळी, किस्मत पटेल, अक्रम मुल्ला, उमेश कांबळे, संदीप काकडे, ॲड. प्रशांत काकडे, ॲड. रोहित अहिवळे, इमरान नियाज, अहमद कुरेशी, दत्ता अहिवळे, सिद्धार्थ अहिवळे, सागर सोरटे, शाम अहिवळे, एस.डी. कांबळे, आबासाहेब यादव, यशवंत कारंडे, विकास काकडे, चंदन काकडे, महादेव गायकवाड, मंगेश आवळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांनी केले यावेळी प्रबुद्ध विद्या भवन, मुधोजी हायस्कूल, विधी महाविद्यालय फलटण, रझाक उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, उर्दू प्राथमिक शाळा मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांना फळवाटप करण्यात आले तसेच भारतीय संविधानाची उद्देशिका प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध संघटनांच्या प्रमुखांना भेट म्हणून देण्यात आली.
Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...
