अर्थसंकल्पात पत्रकारांसाठी तुटपुंजी घोषणा : रविंद्र बेडकिहाळ
एकता दर्शन, फलटण : ‘‘राज्यशासनाकडून सन २०२३-२४ करिता जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शासनाच्या शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये रु.५० कोटींची अधिकच्या तरतुदीची घोषणा करण्यात आली असून ही वाढ तुटपुंजी असल्याची खंत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.
प्रसिद्धी पत्रकात बेडकिहाळ यांनी नमूद केले आहे की, ‘‘राज्याचे अर्थमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सन २०२३-२४ करिता राज्याचा अर्थसंकल्प घोषित केला. यामध्ये पत्रकारांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणार्या शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये असणार्या आधीच्या ५० कोटी रुपयांमध्ये आणखी ५० कोटींची भर घालणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी घोषीत केले. त्यामुळे हा निधी आता १०० कोटी होणार आहे.
वास्तविक पाहता या निधीमधून राज्यातील ज्येष्ठ व वयोवृद्ध पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना व राज्यातील पत्रकारांना आरोग्य सुविधा दिली जाते. पत्रकारांची वाढती संख्या, वाढते वैद्यकीय खर्च व महागाई यामुळे ज्येष्ठ पत्रकारांना अपुरी पडणारी सन्मान निधीची रक्कम, वास्तविक निधीच्या अभावामुळे इतर तांत्रिक कारणे पुढे करत नाकारले जाणारे सन्मान निधीचे आणि वैद्यकीय मदतीचे अर्ज या सारख्या विविध पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये १ हजार कोटी रुपयांची कायमस्वरुपी तरतूद करावी अशी मागणी आपल्यासह इतरही पत्रकार संघटनांनी शासनाकडे केली होती.
समाजातील विविध घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असणार्या विकास महामंडळांच्या धर्तीवर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत असणारा पत्रकार या समाजातील महत्त्वपूर्ण घटकासाठी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी वृत्तपत्र व प्रसारमाध्यम महामंडळा’ची स्थापना करावी, अशीही मागणी आपण केली होती. मात्र पत्रकारांच्या दृष्टीने महत्वाच्या असणार्या या मागण्यांकडे शासनाने दूरदृष्टीने विचार केलेला दिसत नाही. तरी या मागण्यांचा पुनर्विचार करुन आगामी पुरवणी अर्थसंकल्पात याबाबत योग्य ती तरतूद करण्यात यावी’’, असेही बेडकिहाळ यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
