फलटण माझ्याच नियंत्रणात : आमदार रामराजे नाईक निंबाळकर
एकता दर्शन (फलटण) : दिल्ली व मुंबई येथे सत्तांतर झाले तरीही आणि केंद्रातील अनेक मंत्री फलटणला येऊन गेले असले तरीही फलटणमध्ये सत्तांतर होणार नाही. शहर माझ्याच नियंत्रणात राहील व मीच फलटणचा विकास करणार असा विश्वास महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
शुक्रवार पेठ फलटण येथे झालेल्या कार्यकर्ता मेळावा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेविका श्रीमती सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्षा श्रीमती विद्याताई गायकवाड, सुनील मठपती, चंद्रकांत शिंदे, नितीन भोसले, भीमदेव बुरुंगले, सौ.प्रगती कापसे, अनिल जाधव, सुदामराव मांढरे, मेघा सहस्त्रबुद्धे, संजय पालकर, पप्पू शेख, राहुल निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार रामराजे पुढे म्हणाले, नीरा देवघरचा व बारामतीकरांचा काडीमात्र संबंध नसून बारामतीला पाणी न्यायचे असते तर धरणच होऊ दिले नसते. आपण आमदार असताना निरा देवघरचे भूमिपूजन केले आहे.
फलटण-लोणंद रेल्वेची खिल्ली उडविताना आमदार रामराजे म्हणाले, रेल्वेमध्ये दोनच माणसे असतात एक पुढे व एक मागे त्यामुळे रेल्वेचे कौतुक किती वेळा करणार. हिंदुराव हे राजकीय विरोधक असले तरी राजकारणात वैरी नव्हते. मात्र, खासदार हे शुद्र माणूस असल्याचे गंभीर वक्तव्य करत नगरपालिका प्रशासन आजही माझेच ऐकते असे रामराजे म्हणाले.

नाईकबोमवाडी येथे उभा राहत असलेल्या एमआयडीसी संदर्भात आमदार रामराजे म्हणाले, महामार्गापासून १०० किलोमीटर दूर असणाऱ्या ठिकाणी मोठे कारखानदार येऊ शकत नाहीत, त्यामुळे खासदारांनी उपळवे येथील साखर कारखाना तिथे हलवावा असा सल्ला देत गेल्या पाच वर्षात २२७ डीपी चोरीला गेले असून मागच्या सरकारकडून हे डीपी पुन्हा मिळाले असल्याने खासदार हे खोटं बोलत असल्याचे रामराजे यांनी सांगितले.
१९९१ साला पासून आपण फलटणला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याचे स्वप्न पाहिले असून मी ते स्वप्न पूर्णच करून दाखवणार. तालुक्यासाठी केलेल्या कामाचे फळ व वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून येणाऱ्या निवडणुकीत फलटण नगरपालिकेची सत्ता द्या असे आवाहन करत आपण जर विरोधातील खासदार झालो तरी दिल्ली लुटून आणू त्याकरिता डोकं लागतं अशी उपहासात्मक टीका आमदार रामराजे यांनी केली.
जनता माझ्याच सोबत...
प्रचारासाठी एक पंतप्रधान कमी पडल्यावर इंग्लंडचे पंतप्रधान आणले तरीही फलटणची जनता आपल्याच सोबत राहणार असल्याचा विश्वास आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
