लुम्बिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान
फलटण : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील लुम्बिनी बहुद्देशीय सामाजिक संस्था व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन येथे आयोजित करण्यात आला होता.
सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत ऑफीसर जे.एस. काकडे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, मुधोजी महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विधार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान संयुक्ता महावीर अहिवळे (१०वी ९०%), व अथर्व अनंत काकडे (१२वी ८५%) या दोघांना “नालंदा सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. प्रभाकर पवार, सागर डांगे, प्रा. रमेश आढाव, जे.एस. काकडे, दत्ता अहिवळे यांनी उपस्थित विधार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन लुम्बिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुणाल काकडे, युथ आरपीआय आठवले गटाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अभिलाष काकडे, सुशांत काकडे, सुरज काकडे, स्वप्नील काकडे, आदित्य काकडे, डॉ. निलेश गायकवाड, अजय जगताप, ओंकार गायकवाड आदींनी केले होते. याप्रसंगी फलटण नगरपालिकेचे नगरसेवक सचिन अहिवळे, सुधिर अहिवळे, सुपर्णा अहिवळे, अक्षय अहिवळे, राजाभाऊ काकडे, मधुकर काकडे, विकास काकडे (सर) यांच्यासह विद्यार्थी, पालक, नागरिक उपस्थित होते. दरम्यान उपस्थितांचे स्वागत सुशांत काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. वैशाली कांबळे यांनी मानले.

सुमारे ९० यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त येथील लुम्बिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने दहावी व बारावी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी सुमारे ९० यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
