ब्रेकिंग न्यूज

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

12:03 AM आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के

Tuesday, 19 May 2026

Follow Us:

फलटण तालुका पत्रकार संघाला राज्यस्तरीय पुरस्कार

Share This Article:
फलटण तालुका पत्रकार संघाला राज्यस्तरीय पुरस्कार

फलटण तालुका मराठी पत्रकार परिषदेला यावर्षीचा राज्यस्तरीय 'स्व. वसंतराव काणे आदर्श पत्रकार संघ' पुरस्कार मिळाला असून या पुरस्काराचे वितरण दि. ६ रोजी गंगाखेड जि. परभणी येथे समारंभपूर्वक होणार आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राज्यातील परिषदेच्या तालुका पत्रकार संघाला उल्लेखनीय काम केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. यावर्षी राज्यातील ८ आदर्श तालुका पत्रकार संघाना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये पुणे विभागातून फलटण तालुका पत्रकार संघाचा समावेश आहे.

फलटण : शुक्रवार, दिनांक ६ मे रोजी सकाळी ९:३० वाजता गंगाखेड जि. परभणी येथे राज्यस्तरीय पत्रकार मेळावा आणि आदर्श पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा असा संयुक्त कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख भूषविणार आहेत. व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे असून यावेळी आयबीएन लोकमतचे न्यूज अँकर विलास बडे, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार मेघनाताई बोर्डीकर, आमदार राहुल पाटील, राजेश विटेकर, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, माजी आमदार मोहन फड, गंगाखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, कार्यध्यक्ष शरद पाभळे, महिला आघाडी प्रमुख जान्हवी पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे परिषदेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन यांनी सांगितले आहे.

पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह व मानपत्र असे असून पुरस्कार प्राप्त तालुका पत्रकार संघांचे पदाधिकारी कार्यकारिणी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

फलटण पत्रकारितेच्या इतिहासातील पहिला पुरस्कार  

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख व सातारा जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुका पत्रकार संघाने विविध सामाजिक उपक्रम राबविलेच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच फलटण पत्रकार संघाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला असल्याने आगामी काळात नाविन्यपूर्ण काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा या पुरस्कारामुळे मिळणार असल्याचे फलटण तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष प्रा. रमेश आढाव यांनी यावेळी सांगितले.

पुरस्कार प्राप्त तालुका पत्रकार संघ विभागनिहाय पुढील प्रमाणे :

लातूर विभाग : नायगाव तालुका पत्रकार संघ, जि. नांदेड, औरंगाबाद विभाग : सिल्लोड तालुका पत्रकार संघ, जि. औरंगाबाद, कोल्हापूर विभाग : सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, जि. सिंधुदुर्ग, कोकण विभाग : गुहाघर तालुका पत्रकार संघ, जि. रत्नागिरी, नाशिक विभाग : जामखेड तालुका पत्रकार संघ, जि. अहमदनगर, पुणे विभाग : फलटण तालुका पत्रकार संघ, जि. सातारा, अमरावती विभाग : रिसोड तालुका पत्रकार संघ, जि. वाशीम, नागपूर विभाग : नरखेडा तालुका पत्रकार संघ, जि. नागपूर.

Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...

महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....

संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...

दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्‍या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...