फलटणमध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याविरोधात जोडे मारो आंदोलन
एकता दर्शन (फलटण) : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो जरदारी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ माढा लोकसभा मतदार संघातील भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली दि. १७ रोजी सकाळी ११ वाजता फलटणमध्ये भुट्टो यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.
फलटण शहर व तालुक्यातील आक्रमक झालेल्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खासदार रणजितसिंह यांच्या प्रमुख उपस्थित एकत्र येऊन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्या विरोधात घोषणा देत त्यांचा जाहीर निषेध केला.
पाकिस्तानी मंत्र्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याची लायकी नसून पंतप्रधान मोदींची इमेज विश्वव्यापी आहे. अशा नेत्यावर त्यांनी बोलणे म्हणजे स्वतःहून पाकिस्तानवर संकट ओढवून घेणारी कृतीच म्हणावी लागेल. यापुढे बोलताना त्यांनी विचार करून बोलावे अन्यथा याचा गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावा लागणार असल्याचा इशारा खासदार रणजितसिंह यांनी यावेळी दिला.
या आंदोलनात शहर व तालुक्यातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.
Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...
